शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरी फिल्टर नसेल तर पाणी शुद्ध करण्याचे 'हे' १० घरगुती उपाय ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 1:09 PM

1 / 11
आजकाल जास्तीत जास्त घरांमध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे फिल्टर असतातत. पण यातून जेवढ जास्त पाणी शुद्धा होऊन मिळतं, त्यापेक्षा अधिक पाण्याची नासाडी होते. सध्या अशी स्थिती आहे की, थेंब थेंब पाणी वाचवणं गरजेचं आहे. विचार करण्यासारखी बाब ही आहे की, जेव्हा हे पाण्याचे फिल्टर नव्हते, तेव्हा लोक पाणी शुद्ध करण्यासाठी काय उपाय करत होते? तेव्हा पाणी शुद्ध करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जात होते. आज आम्ही तुम्हाला तेच घरगुती उपाय सांगणार आहोत. (Image Credit : Pure Northern Spring Water)
2 / 11
१) निर्गुंडी - निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. एका मडक्यात पाणी भरून त्यात निर्गुंडीची पाने ३० मिनिटांसाठी टाकून ठेवा. हे पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्यी निरगुडीचा समावेश होतो.
3 / 11
२) निर्मलीच्या बीया - निर्मली झाडाचं नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. या झाडाच्या बीया बारीक करून पाण्यात टाका. या बीया पाण्यात २ ते ३ तासांसाठी तशाच राहू द्या. याने पाणी शुद्ध होईल. (Image Credit : asklepios-seeds.de)
4 / 11
३) दही - मध्य प्रदेशातील आदिवासी लोक पाणी शुद्ध करण्यासाठी दह्याचा वापर करतात. हे लोक डोंगरातून खाली येणारं पाणी एका ठिकाणी अडवून ठेवतात आणि त्यात एक कप दही मिश्रित करतात. दही पाण्यातील बॅक्टेरियाला आकर्षित करतं. काही दिवसांनी पाणी पिण्यासाठी वापरलं जातं.
5 / 11
४) खसखस आणि दही - पाणी शुद्ध करण्यासाठी तुम्ही पाण्यात दह्यासोबत खसखसही टाकू शकता. खसखसमध्येही पाणी शुद्ध करण्याचे गुण असतात.
6 / 11
५) शेवग्याच्या शेंगा आणि तुळस - पाण्याच्या मडक्यात शेवग्याच्या शेंगा आणि तुळशीची काही पाने टाका. हा दूषित पाणी शुद्ध करण्याचा एक चांगला उपाय मानला जातो.
7 / 11
६) जांभुळ आणि अर्जुन झाडाची साल - दूषित पाण्यात जांभुळाच्या आणि अर्जुन झाडाची साल सोबतच काही तुळशीची पाने टाकून रात्रभर ठेवा. सकाळी पाणी गाळून एका भांड्यात भरा. याने पाणी शुद्ध होतं.
8 / 11
७) सूर्याची किरणे - दूषित पाणी उन्हात ठेवा. सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे पाण्यातील कीटाणू नष्ट होतात. हे पाणी नंतर पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
9 / 11
८) टोमॅटो आणि सफरचंदाची साल - टोमॅटो आणि सफरचंदाची साल अल्कोहोलमध्ये २ ते ३ तासांसाठी ठेवा. नंतर ही साल काढून उन्हात वाळत ठेवा. सुकल्यानंतर ही साल पाण्यात टाका. २ ते ३ तासांनंतर पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
10 / 11
९) केळीची साल - केळीच्या सालीमध्ये पाण्यातील तांबे आणि शीसं यांसारखे धातू नष्ट करण्याचे गुण असतात. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी केळीच्या सालीचाही वापर करू शकता.
11 / 11
१०) लिंबाचा रस - नळाचं पाणी शुद्ध करण्यासाठी त्यात लिंबाचा रसाचा वापर केला जाऊ शकतो. पाण्यात असलेला बॅक्टेरिया लिंबाच्या रसाने ३० मिनिटात नष्ट होऊ शकतात.
टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषणHealth Tipsहेल्थ टिप्स