शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा या भाज्या, मिळतील इतरही अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 1:11 PM

1 / 8
Food in winter : जर तुम्हाला वाटत असेल की, हिवाळ्यात तुम्हाला कोणत्याही आजाराने आजारी पडायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्याची खूप काळजी घ्यावी लागेल. अशात तुम्ही काही कंदमुळं भाज्यांचं (root vegetable) सेवन केलं पाहिजे. ज्यांच्या मदतीने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येईल. चला जाणून घेऊ अशा भाज्यांबाबत...
2 / 8
- बटाटाचं सेवन हिवाळ्यात नक्की करायला हवं. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी असतात. हे गुण अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करतात. त्यामुळे बटाटे हिवाळ्यात आवर्जून खावेत.
3 / 8
- कांदाही आपल्या डाएटमध्ये ठेवावा. यात फायबर असतं. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. तसेच यातील केरसोटिनने गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते.
4 / 8
- हिवाळ्यात लसणाचंही सेवन करायला हवं. यात सल्फरचं प्रमाण अधिक असतं. याने ग्लूटाथियोनची लेव्हल वाढण्यास मदत मिळते. याने स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते.
5 / 8
- मूळा पोटासाठी फार फायदेशीर मानलं जातं. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. याने पचन तंत्र मजबूत होतं. तसेच हाडेही मजबूत होतात.
6 / 8
- हिवाळ्यात बिटाचं सेवनही केलं पाहिजे. यात बीटा केरोटीन असतं. जे डोळ्यांसाठी फार महत्वाचं असतं. तसेच या आयरन सुद्धा भरपूर असतं.
7 / 8
- आल्याचं सेवन करणंही हिवाळ्यात फायदेशीर ठरतं. याने तुमची इम्यूनिटी मजबूत होते. तसेच याने पचनासंबंधी समस्याही दूर होते.
8 / 8
- गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि अॅंटी टॉक्सिन गुण असतात जे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. यात बायोटीन गुणही असतात जे केसांची वाढ चांगली करतात.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी