शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Oral cancer चे निदान टूथब्रशद्वारे लागणार, IIT Kanpur मध्ये बनवलेले डिव्हाईस लवकरच बाजारात येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 2:23 PM

1 / 8
भारतासह जगभरात तोंडाचा कर्करोग (Oral Cancer) हा चिंतेचा विषय बनला आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, २०२० मध्ये तोंडाचा कर्करोग झाल्यामुळे एकूण १,७७,७५७ लोकांनी आपला जीव गमावला. हा जागतिक स्तरावर १३ वा सर्वात सामान्य कर्करोग आहे. भारतात याचे प्रमाण जास्त आहे, कारण येथील लोक मोठ्या संख्येने गुटखा आणि पान मसाला यासारख्या गोष्टी खातात.
2 / 8
या प्रकारचा कर्करोग वेळीच निदर्शनास आला तर आरोग्याला होणारे नुकसान कमी करता येते. आयआयटी कानपूरने एक उपकरण म्हणजेच डिव्हाईस तयार केले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने तोंडाचा कर्करोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधला जाऊ शकतो. हे डिव्हाईस डिसेंबर २०२४ पर्यंत बाजारात दाखल होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
3 / 8
आयआयटीने हे डिव्हाईस एका कंपनीकडे ट्रान्सफर केले आहे. ही कंपनी डिव्हाईस ब्रशच्या आकारात तयार करेल आणि बाजारात आणेल. या डिव्हाईसला नाव 'मुंह परिक्षक' (Munh Parikshak) असे देण्यात आले आहे. हे एक पोर्टेबल डिव्हाईस आहे. या डिव्हाईसला प्रोफेसर जयंत कुमार सिंह यांनी तयार केले आहे.
4 / 8
प्रोफेसर जयंत कुमार सिंह हे आयआयटी कानपूर येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. आयआयटीने कानपूर शहरातील जवळपास ३ हजार लोकांवर या डिव्हाईसची टेस्ट केली आहे. ज्यामध्ये शालेय लोक, रुग्णालयातील कर्मचारी आणि कारखान्यातील कामगारांचा समावेश आहे. प्रोफेसर जयंत कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, तोंडाचा कर्करोग पहिल्या टप्प्यातच आढळून आला, तर या आजाराला बऱ्याच अंशी प्रतिबंध करणे शक्य आहे.
5 / 8
भारतात असे अनेक लोक आहेत, ज्यांना या कॅन्सरची दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात माहिती मिळते, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि उपचार करणे कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत ब्रशच्या आकाराचे हे डिव्हाईस महत्त्वाचे ठरू शकते. हे एक सामान्य डिव्हाईस आहे. ज्यामध्ये व्हाईट आणि फ्लोरोसेंट लाइट सोर्सचा वापर केला जाते. याला स्मार्टफोन, टॅब्लेट, आयपॅड सारख्या गॅझेट्सशी वायरलेस पद्धतीने कनेक्ट केले जाऊ शकते, असे प्रोफेसर जयंत कुमार सिंह यांनी सांगितले.
6 / 8
याबरोबर या डिव्हाईसमध्ये पॉवर बॅकअप आहे. तसेच, ते ट्रॅकिंग आणि डेटा हिस्ट्री देखील संग्रहित करते. हे डिव्हाईस क्लिनिकल सेटिंग्जमध्ये ९० टक्के अचूकता देऊ शकते. हे वापरण्यास सुरक्षित आहे आणि कोणत्याही प्रकारच्या रासायनिक उपचारांची आवश्यकता नाही. हे ब्रशसारखे डिव्हाईस कर्करोगाच्या टिश्यू आणि नॉर्मल टिश्यूमधील फरक सांगू शकते. याद्वारे दोन्ही बाजूंचे गाल, जीभ टेस्ट केली जाऊ शकते, असे प्रोफेसर जयंत कुमार सिंह यांनी सांगितले.
7 / 8
दरम्यान, या डिव्हाईसची किंमत अद्याप ठरलेली नाही. मात्र, या डिव्हाईसची किंमत एक ते दोन लाख रुपयांच्या दरम्यान निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. कारण, हे डिव्हाईस तयार करण्यासाठी अशी अनेक डिव्हाईसची मदत घेण्यात आली आहे. ही डिव्हाईस परदेशातून आयात करावी लागली आहेत. विशेष म्हणजे ब्रश असलेल्या या सिंगल डिव्हाईसने जवळपास ५ लाख रूग्णांची टेस्ट केली जाऊ शकते, ज्यामुळे ते एकूणच किफायतशीर होते.
8 / 8
दरम्यान, या डिव्हाईसची किंमत अद्याप ठरलेली नाही. मात्र, या डिव्हाईसची किंमत एक ते दोन लाख रुपयांच्या दरम्यान निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. कारण, हे डिव्हाईस तयार करण्यासाठी अशी अनेक डिव्हाईसची मदत घेण्यात आली आहे. ही डिव्हाईस परदेशातून आयात करावी लागली आहेत. विशेष म्हणजे ब्रश असलेल्या या सिंगल डिव्हाईसने जवळपास ५ लाख रूग्णांची टेस्ट केली जाऊ शकते, ज्यामुळे ते एकूणच किफायतशीर होते.
टॅग्स :cancerकर्करोगCancer Awarenessकॅन्सर जनजागृतीHealthआरोग्य