शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंकीपॉक्सबाबत ICMR शास्त्रज्ञ म्हणाल्या, "मुलांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 8:14 PM

1 / 10
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लोकांना साथीच्या आजारापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता एका नवीन व्हायरसने लोकांची चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्स व्हायरस (Monkeypox Virus) जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे.
2 / 10
आतापर्यंत जगातील 20 हून अधिक देशांमध्ये 200 हून अधिक प्रकरणांची पुष्टी झाली आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाबाबत भारत सरकारही सतर्क असून त्यावर लक्ष ठेऊन आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) शास्त्रज्ञ अपर्णा मुखर्जी (Aparna Mukherjee) यांनी मंकीपॉक्सच्या संसर्गाबाबत अनेक मोठी माहिती दिली.
3 / 10
आयसीएमआरच्या शास्त्रज्ञ अपर्णा मुखर्जी यांनी शुक्रवारी सांगितले की, जगातील अनेक बिगर स्थानिक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, परंतु भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे की, अद्याप आपल्या देशात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. खबरदारी म्हणून सरकार त्यावर लक्ष ठेऊन आहे आणि जर मंकीपॉक्सचा संसर्ग भारतात पसरला तर देश त्याच्याशी लढण्यास तयार आहे.
4 / 10
मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या रुग्णामध्ये कोणत्या प्रकारची लक्षणे समजतात? याविषयी माहिती देताना त्या म्हणाले की, जेव्हाही एखाद्याला मंकीपॉक्सचा त्रास होतो, तेव्हा त्याला सामान्यतः खूप ताप येणे, शरीरात खूप दुखणे अशी लक्षणे दिसू लागतात. कधी कधी अंगात खाज सुटणे असेही वाटते.
5 / 10
या व्हायरसची लागण झाल्यानंतर 2-3 दिवसांनी शरीरात पुरळ उठू लागते. आतापर्यंत आमच्याकडे युरोप आणि यूएसए या बिगर स्थानिक देशांमध्ये या व्हायरसच्या संसर्गाच्या प्रकरणांची माहिती मिळाली आहे, असे अपर्णा मुखर्जी यांनी सांगितले.
6 / 10
शास्त्रज्ञ अपर्णा मुखर्जी म्हणाल्या की, जर एखादा प्रवासी ज्या देशांतून मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत, त्या देशांतून प्रवास करून आल्यास तो कोणत्याही त्रासाशिवाय आणि संकोच न करता स्वतःची चाचणी करू शकतो. आपल्याला घाबरण्याची गरज नाही.
7 / 10
मंकीपॉक्स व्हायरस सामान्यतः तेव्हाच पसरतो जेव्हा खूप जवळचा संपर्क असतो. यासाठी विहित मार्गदर्शक तत्त्वे आहेत, जी ICMR-NIV ने आधीच प्रकाशित केली आहेत. तसेच, मुलांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते, असे अपर्णा मुखर्जी यांनी सांगितले.
8 / 10
दरम्यान, मंकीपॉक्स हा नवीन आजार नाही. हे आफ्रिकन देशांमध्ये बऱ्याच काळापासून आहे. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे, कारण ज्या देशांमध्ये हा आजार यापूर्वी कधीच नव्हता अशा देशांमध्येही मंकीपॉक्स व्हायरस वेगाने पसरत आहे. फार कमी वेळात हा व्हायरस 20 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे.
9 / 10
गेल्या काही दिवसांत जिथे मंकीपॉक्सचे रुग्ण झपाट्याने समोर आले आहेत. त्यात अमेरिका, बेल्जियम, ब्रिटन, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, यूएई, इटली, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी यासारख्या अनेक मोठ्या देशांचा समावेश आहे.
10 / 10
भारतासह जगभरातील अनेक देशांनी याबाबत रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. युनायटेड किंगडममध्ये मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत येथे जवळपास 90 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.
टॅग्स :Healthआरोग्य