शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युद्ध जिंकणार! भारतानं आखला कोरोना लसीचा 'ग्लोबल प्लॅन'; पाक वगळता इतर देशांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 2:45 PM

1 / 10
देशभरात कोरोनाच्या संक्रमणात वाढ होत आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर तयार होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकार पाच वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहे.
2 / 10
यात विनामुल्य लस आणि विश्वासार्ह वितरण यांचा समावेश आहे. कोरोनाच्या लसीबाबत मोठी माहिती समोर येत आहे. केंद्र सरकरानं आपल्यासह इतर देशांनांही लस पुरवण्याचा ग्लोबल प्लॅन तयार केला आहे. यात पश्चिम आशिया, लॅटीन, अमेरिका या देशांचा समावेश आहे.
3 / 10
भारतात सध्या तीन लसींच्या चाचण्या सुरू आहेत. पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीया या कंपनीच्या लसीबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लस लवकरच तयार होणार आहे.
4 / 10
सीरम कंपनीसोबत एक्स्ट्राजेनकासह तीन कंपन्यांची भागिदारी आहे. कोरोना लसीच्या योजनेशी संबंधीत एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या योजनेबाबत कोणताही अंतिम प्लॅन तयार करण्यात आलेला नाही.
5 / 10
दुसऱ्या मॉडेल अंतर्गत कोरोनाची लस गरीब देशांपर्यंत पुरवली जाणार आहे. अनेक अफ्रिकी देशांना या लसीचा फायदा मिळू शकतो.
6 / 10
कोरोनाची लस कोणत्या देशांना दिला जाईल याबाबत विचार केला जाणार आहे. ग्लोबन लस तयार करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केला जात आहे. सरकारच्या पहिल्या योजनेत लसीच्या नि:शुल्क वितरणाचा समावेश आहे.
7 / 10
बांग्लादेश, अफगाणिस्तान सारख्या देशांसाठी हा ग्लोबल प्लॅन असणार आहे. यात पाकिस्तानला सहभागी करून घेतलं जाणार नाही. पाकिस्तान चीनमध्ये तयार होत असलेल्या लसीवर अवलंबून असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
8 / 10
दुसऱ्या मॉडेल अंतर्गत कोरोनाची लस गरीब देशांपर्यंत पुरवली जाणार आहे. अनेक अफ्रिकी देशांना या लसीचा फायदा मिळू शकतो.
9 / 10
तिसऱ्या मॉडेल अंतर्गत अनेक देशातील बाजाराभावावरून लसीची किंमत निश्चित केली जाणार आहे. मोठ्या संख्येनं लस तयार झाल्यानंतर खुल्या बाजारत वितरण केलं जाणार आहे.
10 / 10
चौथ्या मॉडेल अंतर्गत भारताकडून काही देशांना लस उप्तादन करण्याची मंजूरी देण्यात येणार आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत