शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रयत्न करुनही झोप येत नसेल तर आहारात या' पदार्थांचा समावेश करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 11:58 AM

1 / 7
अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी अनेक प्रयत्न करुनही झोप येत नाही. काहींना काही गोष्टींचं टेन्शन असतं तर काहींना आरोग्यासंबंधी काही समस्या असू शकतात. पण झोप पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवसातील सगळी कामे रखडू शकतात हेही तितकच खरं आहे. तुम्हाला या समस्येपासून सुटका करायची असेल तर तुम्ही आहारामध्ये थोडा बदल करू शकता. त्यामुळे तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळण्यास मदत होईल.
2 / 7
अनिद्रेच्या समस्येने त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यावं. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
3 / 7
अनिद्रेची समस्या दूर करण्यासाठी जायफळही फायदेशीर ठरतं. दूधामध्ये थोडं जायफळ टाकून ते दूध प्यावं किंवा थोडं जायफळ उगळून ते मधासोबत घ्यावं.
4 / 7
केशर हे झोपेच्या तक्रारींवर परिणामकारक ठरतं. केशर पाण्यामध्ये भिजवून ते पाणी प्यावं किंवा केशर दूधासोबत घ्यावं.
5 / 7
केळीसुद्धा अनिद्रेची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
6 / 7
हर्बल चहा शरीरातील हानिकारक तत्व दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे झोपेशी निगडीत समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.
7 / 7
शरीराला मसाज केल्याने स्ट्रेस रिलिफ होण्यास मदत होते. तसेच त्यामुळे शांत झोपही लागते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स