शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुड कोलेस्ट्रॉल खरंच 'गुड' असतं? हृदयाच्या आरोग्यावर होतो असा परिणाम; जाणून घ्या काय म्हणतात डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 3:54 PM

1 / 9
आपण बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉलसंदर्भात अनेक वेळा ऐकले असेल. यांपैकी, बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते, तर गुड कोलेस्ट्रॉल चांगले असते, असे मानले जाते. तर आता प्रश्न असा आहे की, खरोखरच गुड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी चांगले असते का? तर जाणून घेऊयात काय आहे सत्य...? काय म्हणतायत डॉक्टर...?
2 / 9
यासंदर्भात नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. वनीता अरोरा यांनी दिलेल्या माहिती नुसार, आपल्या शरीरात हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) असते. यालाच गुड कोलेस्ट्रॉल म्हटले जाते. तर लो डेन्सिटी लिपोप्रोटीनला (LDL) बॅड कोलेस्ट्रॉल म्हटले जाते.
3 / 9
गुड कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी चांगले मानले जाते. तर बॅड कोलेस्ट्रॉल हे चांगले मानले जात नाही. महत्वाचे म्हणजे, कोलेस्ट्रॉल लेव्हल कार्डिओव्हॅस्कुलर सिस्टिमला प्रभावित करते. रक्तात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
4 / 9
डॉक्टर वनीता अरोरा न्यूज १८ सोबत बोलताना पुढे म्हणाल्या, आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल 100 mg/dL पेक्षाही कमी असायला हवे. तेव्हा हे नॉर्मल मानले जाते. तर गुड कोलेस्ट्रॉलचे रक्तातील प्रमाण 50 mg/dL अथवा याहून अधिक असायला हवे. तसेच, रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉल 200 mg/dL पेक्षा कमी असायला हवे.
5 / 9
कोलेस्ट्रॉल हा रक्तातील मेणासारखा पदार्थ आहे, ते अधिक झाल्यास, रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. यामुळे हृदय आणि मेंदूला होणाऱ्या रक्त पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे कोलेस्ट्रॉलबाबत गाफील न राहता वेळच्या वेळी त्याची तपासणी करायला हवी.
6 / 9
खरंच गुड कोलेस्ट्रॉल 'गुड' असते? - कार्डिओलॉजिस्ट म्हणतात की, हाई डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL) हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असते. जर रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असेल, तर ते रक्तवाहिण्यांमध्ये जमलेले बॅड कोलेस्ट्रॉल मलमार्गे शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते.
7 / 9
गुड कोलेस्ट्रॉल आर्टरीमध्ये जमणारे प्लेक रोखते आणि रक्तपुरवठा सुरळित ठेवण्यास मदत करते. यामुळे हार्ट डिसीज आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. गुड कोलेस्ट्रॉल आपल्या सेल्सना हेल्दी ठेवते आणि इंफ्लेमेशन व ऑक्सीडेंटला परिणाम शून्य करते. यामुळे, लक्तवाहिण्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात.
8 / 9
प्रमाणापेक्षे अधिक गुड कोलेस्ट्रॉलही घातक? - डॉक्टर वनिता यांनी म्हटल्याप्रमाणे, आपल्या रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण ५०mg/dL ते 80mg/dL एवडे असायला हवे. हे प्रमाण यापेक्षा कमी झाले तरी अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते आणि 80mg/dL पेक्षा अधिक झाले तरीही ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
9 / 9
जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक झाले तर ते बॅड कोलेस्ट्रॉलपासून हृदयाचे संरक्षण करणेही थांबू शकते. परिणामी मृत्यूचा धोकाही वाढू शकतो. मात्र, गुड कोलेस्टेरॉलची पातळी अधिक कमी होण्याची अथवा अचानक वाढण्याची शक्यता कमी असते. मात्र, गुड कोलेस्ट्रॉल आजारामुळे फ्लक्चुएट होऊ शकते.
टॅग्स :Healthआरोग्यHeart Diseaseहृदयरोग