शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सकाळी की रात्री... नेमकं कधी फायदेशीर ठरतं 'चालणं'?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 3:55 PM

1 / 8
सध्याच्या धावपळीच्या जगात कामाला महत्त्व देता देता स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आरोग्यसंबंधित काही समस्या असतील तर त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण असं करणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
2 / 8
चालणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नेहमीच चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र नेमकं कधी चालायचं... सकाळी की रात्री? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत जाणून घेऊया...
3 / 8
रात्री किंवा सकाळी, तुम्ही कधीही चालू शकता. लोक त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे चालण्यासाठी पुरेसा वेळ काढू शकत नाहीत. सकाळी वॉकला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. अशावेळी ते रात्रीचा वेळ हा चालण्यासाठी निवडतात.
4 / 8
सकाळी चालण्याने मेटाबॉलिज्म वाढतं. तसेच तुम्हाला व्हिटॅमिन डी देखील मिळतं. सकाळी चालण्यामुळे किंवा धावण्यामुळे तुम्ही प्रदुषणापासून थोडं लांब राहू शकता. तुम्हाला ऊर्जा देखील मिळते.
5 / 8
जर तुम्ही रात्री चालत असाल तर तुम्ही जेवलेलं अन्न योग्यरित्या पचतं. तसेच तणावपासून दूर राहता. रात्री चालण्यामुळे शरीराला आराम मिळतो. झोपही चांगली लागते.
6 / 8
रोजच्या दैनंदिन कामातून वेळात वेळ काढून सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री कमीत कमी अर्धा तास चालणं महत्त्वाचं आहे.
7 / 8
मन शांत ठेवण्यासोबतच चालण्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार आहे. चालताना तुम्ही नेमकी किती पावलं चालता आणि किती वेळ चालता याकडे लक्ष ठेवा.
8 / 8
उन्हाळ्यात चालताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही सकाळी चालत असाल तर उन्हाच्या आधी चाला. पाण्याची बॉटल सोबत ठेवा. जर काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स