शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकाच जागेवर बसून काम करता?, असा काढा स्वतःसाठी वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 7:02 PM

1 / 7
सलग एकाच जागेवर बसून राहून काम करत असाल, तर कामातून स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला शिका. वेळ काढून ऑफिसमध्ये थोड्या वेळासाठी पाय मोकळे करा.
2 / 7
शक्य असल्यास जिण्यांचा वापर करा. यामुळे तुमच्या हृदयाचे कार्य आणि रक्ताभिसरणदेखील चांगल्या पद्धतीने होईल आणि अनेक आजारांपासून तुमची सुटका होईल.
3 / 7
काही वेळेस उभे राहून काम करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला तात्पुरता आराम मिळेल.
4 / 7
पण, समजा तुम्हाला खुर्चीवरच बसून राहायचे आहे तर योग्य स्थितीत बसा. पाठीला बाक काढून किंवा एका बाजूने झुकून काम करणं टाळा.
5 / 7
आपल्या जागेवरच बसून जेवण्याऐवजी कॅन्टीन किंवा लंच रूममध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या. यामुळे तुमचा थोडासा वॉकदेखील होईल.
6 / 7
काम करताना अधेमधे मान आणि खांद्याच्या हालचाल होऊ द्या. याशिवाय, ऑफिसमधून बाहेर पडून अंगावर थोडेसे ऊन घ्या.
7 / 7
हात नसलेल्या खुर्चीचा वापर करावा. कारण हात असलेल्या खुर्च्यांमुळे हात अगदीच सरळ स्थितीत राहतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स