Jaiphal Heath benefits: Amazing reasons you should include nutmeg in your daily diet
जायफळाचा रोजच्या आहारात करा समावेश, फायदे इतके की विचारही केला नसेल! By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 2:14 PM1 / 10भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. हे मसाले वेगवेगळ्या खाद्य पदार्थांमध्ये टाकले जातात. सोबतच यांचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. असाच एक मसाला म्हणजे जायफळ. याचा सुगंधही चांगला आणि टेस्ट गोड असते. याचे आरोग्याला खूपसारे फायदे होतात, पण ते जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतात.2 / 10जायफळमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इतर कार्बनिक तत्व असतात. त्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. यातून शरीराला व्हिटॅमिन बी 6, फोलोट, मॅग्नेशिअम, फायबर, मॅगनीज, कॉपर, थियामिन आणि मॅक्लिग्नानसारखे फायदेशीर तत्व असतात. चला जाणून घेऊ याचे आरोग्याला होणारे फायदे.3 / 10पचन तंत्र होतं मजबूत - पोटासंबंधी काहीही समस्या असेल जसे की, गॅस, बद्धकोष्ठता या जायफळाच्या मदतीने दूर होतात. जायफळाने पचन तंत्र मजबूत राहण्यास मदत मिळते. खासकरून हिवाळ्यात जायफळाचा वापर जास्त फायदेशीर ठरतो. याने शरीरात फायबरचं प्रमाण कायम राहतं. जायफळामुळे आतड्यांच्या मांसपेशींमध्ये पेरिस्टाल्टिकची गती वाढते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. 4 / 10डोकेदुखी दूर करण्यास मदत - अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जायफळाने डोकेदुखी आणि इतर शारीरिक वेदनाही दूर होतात. जायफळांची पेस्ट डोक्यावर लावली तर या समस्या दूर होतात. जायफळात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि सूज कमी करणारे गुण असतात. 5 / 10दातदुखी होते दूर - जर तुमच्या दातांमध्ये वेदना होत असेल तर जायफळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. जायफळाचं पावडर दातांवर लावा आणि काही वेळाने गुरळा करा. दातांची वेदना दूर करण्यासाठी तुम्ही जायफळाच्या तेलाचाही वापर करू शकता. 6 / 10त्वचेसंबंधी समस्या - त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी जायफळाचा वापर करू शकता. यामुळे त्वचा मुलायम आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. जायफळात व दालचीनी पावडर मिक्स करून स्क्रब तयार करा आणि याने ब्लॅकबेड्स दूर करण्यास मदत मिळते.7 / 10जायफळाने चांगली झोप - जर तुम्हाला चांगली येण्यास समस्या होत असेल तर जायफळ फायदेशीर ठरू शकतं. यात मॅग्नेशिअम जास्त असतं. ज्यामुळे तणाव दूर होऊन मेंदू शांत राहतो. तसेच जायफळामुळे सेराटोनीन उत्तेजित होतं आणि यामुळे चांगली झोप येण्यास मदत मिळते. अशात रात्री थोडं जायफळ पावडर दूधात टाकून प्यावं. 8 / 10डोळ्यांसाठी फायदेशीर जायफळ - जायफळाने तुमची बुद्धीच नाहीतर डोळ्यांचंही आरोग्य चांगलं होतं. जायफळाच्या पावडरचा लेप बनवून तो पापण्यांवर आणि डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. 9 / 10घशाची समस्या होईल दूर - जायफळाने घशासंबंधी समस्याही दूर होतात. याच्या वापराने आवाजाची गुणवत्ता वाढते. त्याशिवाय याने घसा साफ होण्यासही मदत मिळते. घशाला आराम मिळण्यासाठी एक चमचा जायफळचं पावडर कोमट पाण्यात टाकून प्या.10 / 10मुलांसाठी फायदेशीर - जर लहान मुलांचं वय 9 महिन्यांपेक्षा जास्त असेल तर मुलांना थंडी आणि खोकल्यापासून वाचवण्यासाठी जायफळाचा वापर करावा. आणखी वाचा Subscribe to Notifications