Katrina kaif keeps herself fit and healthy with these exercises
कतरिना कैफचा फिटनेस फंडा; डाएट, एक्सरसाइज आणि बरचं काही... By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 12:54 PM1 / 8जर तुम्ही वजन कमी करण्यासोबतच फिट अन् हेल्दी राहण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी आणि आपल्या अदांनी अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या कटरिना कैफकडून फिटनेस टिप्स घेऊ शकता. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये बोलताना अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या स्लिम ट्रिम असण्यासोबतच फिटनेसचंही गुपित उलगडलं आहे. 2 / 8आपल्या फिटनेसबाबत सांगताना कतरिनाने सांगितले की, जर फिटनेस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल तर तुम्ही कितीही बीझी असलात तरिही स्वतःसाठी निदान 45 मिनिटांचा वेळ नक्की काढा. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार योग्य तो फिटनेस आणि ट्रेनिंग प्रोग्रामची निवड करा. तसेच इतरांना कॉपी करू नका. असं केल्याने फायदा कमी आणि नुकसान जास्त होतं, असंही कतरिना सांगते. 3 / 8कतरिना आठवड्यातून सात दिवस 1 ते 3 तास एक्सरसाइज करते. कार्डियो, वेट ट्रेनिंग, स्क्वॉट्स, पुश अप्स आणि लंजेस या सर्व तिच्या फेवरेट एक्सरसाइज आहेत. यामुळे तिला फिट आणि हेल्दी राहण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त कतरिना पिलाटेज आणि योगाभ्यासही कतरिना करते. 4 / 8आपल्या डाएटबाबत सांगताना कतरिना सांगते की, ती रिफाइंड शुगर आणि डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन अजिबात करत नाही. दरम्यान, आपल्या फेवरेट पदार्थांबाबत विचारल्यानंतर कतरिनाने चीज डोसा तिला आवडत असल्याचे सांगितले. 5 / 8कतरिनाने बोलताना हेदेखील सांगितले की, झोपण्यापूर्वी 2 तास अगोदर ती कोणतंही गॅजेट्स अजिबात वापरत नाही. कारण यातून बाहेर पडणारी ब्लू लाइटचा झोपेवर परिणाम होतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. 6 / 8टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 7 / 8टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 8 / 8टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications