संकटं संपता संपेना! कोरोनानंतर 'या' खतरनाक व्हायरसचा कहर; चिमुकल्यांवर करतोय अटॅक By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:02 AM
1 / 10 देश कोरोना व्हायरसच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना असतानाच आता धोकादायक नोरोव्हायरसची प्रकरणे समोर आली आहेत. केरळमध्ये नोरोव्हायरसची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 2 / 10 केरळमधील एर्नाकुलमनंतर आता कोचीमध्ये नोरोव्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. कोची येथील एका शाळेतील अनेक मुलांमध्ये नोरोव्हायरसची लक्षणे दिसून आली आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासणीत 2 मुले नोरोव्हायरस पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. तर इतर 15 मुलांमध्येही याची लक्षणे दिसून येत आहेत 3 / 10 नोरोव्हायरस देखील अगदी कोरोना व्हायरससारखाच आहे. नोरोव्हायरसची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर आता केरळ सरकारची चिंता वाढली आहे. याआधी एर्नाकुलममध्ये एकाच वेळी 19 मुलांमध्ये नोरोव्हायरस आढळून आले होते. 4 / 10 पहिल्या 2 मुलांमध्ये नोरोव्हायरसची पुष्टी झाली, त्यानंतर एकूण 19 मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. काही मुलांच्या नातेवाईकांमध्येही त्याची लक्षणे दिसून आली आहेत. कोरोनाच्या संकटात नव्या आजाराची दहशत पाहायला मिळत आहे. 5 / 10 संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, इयत्ता 1 ते 5 वीच्या मुलांसाठी शाळा बंद करण्यात आली आहे. मुलांचे वर्ग आता ऑनलाईन चालतील. गेल्या वर्षी जून आणि नोव्हेंबरमध्येही नोरोव्हायरसची लक्षणे दिसून आली होती. 6 / 10 नोरोव्हायरस हा विषाणूजन्य आजार आहे. नोरोव्हायरस संसर्ग आतड्यांसंबंधी जळजळ, कुपोषणाशी संबंधित आहे आणि दीर्घ काळ होऊ शकतो. जागतिक स्तरावर, नोरोव्हायरसची अंदाजे 68.5 कोटी प्रकरणे दरवर्षी पाहिली जातात. ज्यामध्ये 20 कोटी प्रकरणे पाच वर्षांखालील मुलांशी संबंधित आहेत. 7 / 10 नोरोव्हायरस विरूद्ध प्रतिबंध करणे खूप महत्वाचे आहे. हे दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरते. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उलट्या आणि जुलाब यांचा समावेश होतो. 8 / 10 विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर एक किंवा दोन दिवसांत संक्रमित व्यक्तीला उलट्या आणि जुलाब होऊ लागतात. रुग्णाला मळमळ वाटते आणि पोटदुखी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी जाणवते. ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 9 / 10 नोरोव्हायरस 60 अंश तापमानातही जिवंत राहू शकतो. उकळत्या पाण्याने तो मारला जाऊ शकत नाही. लहान मुले आणि वृद्धांना या विषाणूपासून विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण संसर्ग झाल्यामुळे आणि जास्त उलट्या आणि जुलाब झाल्यामुळे त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते. 10 / 10 नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटले आहे की नोरोव्हायरसपासून बचाव करण्यासाठी एखाद्याने नियमितपणे हात धुवावेत. फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी गरम पाण्यात चांगल्या प्रकारे धुवाव्यात. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा