शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kidney Care Tips: किडनीच्या रूग्णांना महागात पडू शकतात या सवयी, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 1:09 PM

1 / 7
Kidney Care Tips: किडनी आपल्या शरीरात सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते. चांगल्या आरोग्यासाठी किडनी चांगली असणं फार गरजेचं आहे. नाही तर याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. जर किडनीमध्ये काही समस्या झाली तर याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. चला जाणून घेऊ किडनी हेल्दी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
2 / 7
जास्त न झोपणे - आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर झोप घेणं फार गरजेचं असतं. पण किडनीच्या रूग्णांना सकाळी जास्त वेळ झोपणं महागात पडू शकतं. जास्त वेळ झोपल्याने ब्लॅडरमध्ये जास्त लघवी जमा होते, ज्यामुळे किडनीला नुकसान पोहोचू शकतं.
3 / 7
मिठाचं जास्त सेवन - मिठाने पदार्थांना चव येते. मिठामध्ये सोडिअम असतं जे किडनीवर वाईट प्रभाव पाडू शकतं. जर तुम्हाला किडनीसंबंधी काही समस्या असेल किंवा किडनीसंबंधी समस्या होऊ द्यायच्या नसेल तर मिठाचं सेवन कमी करा. जास्त मिठामुळे ब्लड प्रेशरही वाढू शकतं.
4 / 7
मद्यसेवन - अल्कोहोलमुळे किडनीवर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही दारू पित असाल आणि किडनीची समस्या असेल तर लगेच दारू पिणं सोडा. दारू प्यायल्याने किडनीच्या समस्या वाढू शकतात.
5 / 7
पाण्याचं कमी प्रमाण - किडनीच्या स्वच्छतेसाठी पाणी पिणं फार गरजेचं आहे. भरपूर पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ शरीरात जास्त जमा होत नाहीत. कमी पाणी प्यायल्याने वेस्ट मटेरिअल किडनीमध्ये जमा राहतं आणि याने किडनीला नुकसान पोहोचू शकतं.
6 / 7
शरीराला अॅक्टिव न ठेवणं - काही लोक आजारी झाल्यावर केवळ बसून आराम करतात. किडनीची समस्या असेल तर शरीर अॅक्टिव ठेवणं फार गरजेचं आहे. जर तुमच्या किडनीमध्ये काही समस्या असेल तर हलका व्यायाम करा किंवा योगा करा.
7 / 7
हाय पोटॅशिअम असलेले पदार्थ खाणे - किडनीच्या रूग्णांनी हाय पोटॅशिअम असलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. किडनीची समस्या असल्यावर बटाटे, रताळे खाऊ नये. केळी आणि एवोकेडो खाणंही किडनीच्या रूग्णांना महागात पडू शकतं. कारण यांमध्ये पोटॅशिअम जास्त असतं. याने किडनी डॅमेज होऊ शकते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य