Kidney Stone : Avoid eating these seed vegetables to avoid kidney stone
Kidney Stone: या भाज्या खाल्ल्याने किडनीतील स्टोनचा वाढतो आकार, वेळीच घ्या काळजी... By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:02 AM1 / 6How To Avoid Kidney Stone: आपलं आरोग्य तेव्हाच चांगलं राहू शकतं जेव्हा शरीरातील सर्व अवयव योग्यप्रकारे काम करत असतील. अनेकदा छोट्या छोट्या समस्याही मोठ्या होतात. किडनी स्टोनची समस्याही अशीच आहे. ज्याप्रकारे लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला आहे ही समस्या कॉमन झाली आहे. काही असे पदार्थ, भाज्या आहेत जे किडनी स्टोनचं वाढण्याला कारणीभूत ठरू शकतात. तुम्हाला आधीच किडनी स्टोन असेल तर हे पदार्थ किंवा भाज्या किडनी स्टोन वाढवू शकतात. अशात हे पदार्थ टाळा किंवा कमी खाऊ शकता. 2 / 6बियांच्या भाज्यांबाबत सांगायचं तर किडनी स्टोनची समस्या असलेल्या लोकांनी टोमॅटो खाणं टाळलं पाहिजे. कारण टोमॅटोमध्येही ऑक्सालेट आढळतं ज्याने स्टोनचा आकार मोठा होतो. कमी प्रमाणात टोमॅटोचं सेवन करता येऊ शकतं. कारण यात आढळणारं ऑक्सालेट हे कमी प्रमाणात असतं. 3 / 6किडनी स्टोनची समस्या असेल तर काकडी खाणंही नुकसानकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्याने शरीरात पोटॅशिअमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे Hyperkalemia नावाचा एक आजार होण्याचा धोका असतो. जास्त काकडी खाल्ल्याने तुमच्या स्टोनचा आकारही वाढतो. तुम्हाला त्रास जास्त होऊ शकतो.4 / 6तुम्ही आधीच किडनी स्टोनच्या समस्येने हैराण असाल तर तुमच्यासाठी पालक खाणंही महागात पडू शकतं. कारण पालक खाल्ल्यानेही स्टोनचा आकार मोठा होतो. पालकमध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असतं जे आपल्या शरीरात कॅल्शिअम ऑक्सालेट तयार करतं. यामुळे किडनीतील स्टोनचा आकार मोठा होऊ लागतो. तुम्हाला किडनी स्टोन असेल तर पालक खाणं टाळा.5 / 6पालकाशिवाय वांग्यांमध्येही ऑक्सालेट आढळून येतं. याने किडनीतील स्टोनचा आकार वाढतो. अशात तुम्ही जर किडनी स्टोनच्या समस्येने हैराण असाल तर वांगी खाणं टाळलं पाहिजे. हेच कारण आहे की, डॉक्टरही किडनी स्टोनच्या रूग्णांना वांगी न खाण्याचा सल्ला देतात.6 / 6जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर तुम्ही जंक फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजे. कारण यात सोडिअमचं प्रमाण जास्त असतं. त्याशिवाय मिठाचं अधिक प्रमाणात सेवन करणंही टाळलं पाहिजे. तसेच प्रोटीनचं सेवनही कमी करा. मांस-मासे खाणं टाळा. किडनी स्टोनची समस्या असेल तर व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ, फळं खाणंही टाळलं पाहिजे. आणखी वाचा Subscribe to Notifications