KINDER RECALLS CHOCOLATE EGGS AFTER SALMONELLA CASES
पालकांची चिंता वाढली! किंडर जॉयच्या उत्पादनामुळे मुलांना होतोय धोकादायक आजार By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 1:22 PM1 / 8जगभरातील लहान मुलांमध्ये किंडर जॉयची उत्पादनं लोकप्रिय आहेत. अनेक मुलं किंडर जॉयसाठी पालकांकडे हट्ट धरतात आणि पालकही त्यांचा हट्ट पुरवतात. 2 / 8किंडर जॉयचं उप्तादन करणाऱ्या फेरेरो कंपनीनं आपलं एक उत्पादन बाजारातून परत मागवलं आहे. उत्पादन आरोग्यासाठी सुरक्षित नसल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे.3 / 8ब्रिटनमधील खाद्य सुरक्षा यंत्रणा असलेल्या एफएसएनं ग्राहकांना किंडर जॉयच्या काही उत्पादनांचा वापर न करण्याचा सल्ला दिला. किंडरच्या उत्पादनांमुळे साल्मोनेलाचं संक्रमण होत असल्याचा संशय एफएसएला आहे. 4 / 8कंपनीच्या उत्पादनांमध्ये आणि ब्रिटनमध्ये पसरणाऱ्या साल्मोनेला संक्रमणात संबंध असल्याचं UKHSA आणि युरोपीतील काही अन्य आरोग्य यंत्रणांच्या तपासात आढळून आलं आहे. 5 / 8फेरेरो कंपनीनं सतर्कता म्हणून बाजारातून आपलं उत्पादन मागे घेऊन तपास सुरू केलं आहे. मागे घेण्यात आलेलं उत्पादन एकाच कारखान्यात तयार करण्यात आलं आहे. 6 / 8किंडर सरप्राईजच्या काही बॅच मागे घेण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं. किंडर सरप्राईजची २० ग्रॅमची पाकिटं, ज्यांची वैधता ११ जुलै २०२२ ते ७ ऑक्टोबर २०२२ च्या दरम्यान आहे, त्या बॅच मागे घेण्यात आल्या आहेत.7 / 8साल्मोनेलाचं संक्रमण कच्चं मांस, पार्श्चराईज न केलेलं दूध, अंडं, गोमांस आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांमधून होतं. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना साल्मोनेलाची लागण झाल्यास ती धोकादायक ठरू शकते. 8 / 8साल्मोनेलाची बाझा झाल्यास तिचा प्रभाव जवळपास ४ ते ७ दिवस असतो. पोटदुखी, उलटी, अतिसार, मळमळ, ताप, थंडी वाजणं, डोकेदुखी, शौचावाटे रक्त येणं ही साल्मोनेलाची लक्षणं आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications