Know 8 best ways and foods to clean your kidney and remove stones naturally
किडनीचे फिल्टर पूर्णपणे स्वच्छ करतात हे 8 पदार्थ, कितीही मोठा किडनी स्टोनचं होईल पाणी... By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 1:28 PM1 / 11नुकताच म्हणजे 9 मार्च रोजी जगभरात वर्ल्ड किडनी डे (World Kidney Day) पाळण्यात आला. या दिवशी लोकांना किडनीच्या आजारांबाब जागरूक केलं जातं. किडनी शरीरात महत्वाचा अवयव आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हा छोटा अवयव रोज रक्ताचा एक चतुर्थांश भाग स्वच्छ करतो.2 / 11त्याशिवाय किडनीचं काम शरीरात अनावश्यक पाणी, तरल पदार्थ बाहेर काढणं, विषारी पदार्थ बाहेर काढणं आहे. आपल्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींमधूनच शरीरात विषारी पदार्थ जातात, जे किडनीला डॅमेज करू शकतात. किडनीमध्ये स्टोन तयार करतात. किडनीमध्ये स्टोन तयार करणारं यूरिक अॅसिड वाढवू शकतात.3 / 11किडनी काम आणखी चांगलं करण्यासाठी त्याची स्वच्छता गरजेची आहे. शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ रक्त अशुद्ध करतात आणि किडनीच्या कामाला प्रभावित करतात. सोबतच याने सूज, किडनी स्टोन, यूरिक अॅसिड वाढतं. हे पदार्थ बाहेर काढले आणि किडनी स्वच्छ केली तर हार्मोनल असंतुलन ठीक होतं. ज्यामुळे पिंपल्स, एक्जिमा आणि रॅशेज सारख्या समस्या होणार नाहीत.4 / 11अॅपल व्हिनेगर - USA च्या अॅडव्हांस यूरोलॉजी इंस्टीट्यूटनुसार, अॅप्पल साइडर व्हिनेगर किडनीचा ऑक्सीडेटिव स्ट्रेस रोखण्यास मदत करतो. याने शरीरात अॅंटी-ऑक्सिडेंटची लेव्हल वाढते, ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते आणि हाय ब्लड प्रेशर कमी केलं जातं. ज्यामुळे किडनीचं आरोग्यही चांगलं राहतं. अॅप्पल व्हिनेगरमध्ये साइट्रिक अॅसिड असतं. जे किडनी स्टोनचं पाणी करतं. अॅप्पल व्हिनेगरचं नेहमी सेवन केलं तर किडनीतील विषारी पदार्थ बाहेर निघतात.5 / 11राजमा - किडनीसारखा दिसणारा राजमा किडनीतील अपशिष्ट आणि विषारी पदार्थ शरीरात बाहेर काढण्याचं काम करतो. तसेच किडनी स्टोन दूर करण्यासही याने मदत मिळते. राजमामध्ये व्हिटॅमिन बी, फायबर आणि अनेक मिनरल्स असतात. जे किडनीला साफ करण्याचं आणि लघवीची नलिका साफ करण्यास मदत करतात.6 / 11लिंबाचा रस - लिंबाच्या रसामध्ये आम्ल असतं आणि ते लघवीमध्ये सायट्रेटचं प्रमाण वाढवतं. हेच कारण आहे ते किडनीमध्ये स्टोन होण्यापासून रोखतं. लिंबाचा रस रक्ताला फिल्टर करतं आणि इतर विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढतं. 7 / 11कलिंगड - कलिंगड हे उन्हाळ्यात फार आरोग्यदायी मानलं जातं. याने किडनी हायड्रेट आणि स्वच्छ होते. यात लायकोपीन भरपूर प्रमाणात असतं आणि किडनीचं कामही सुरळीत करतं. कलिंगडामध्ये पोटॅशिअम असतं, जे लघवीतील आम्लता कमी करतं आणि स्टोन होण्यापासून रोखतं.8 / 11डाळिंब - डाळिंबाचा रस आणि बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. त्यामुळे याने स्टोन कमी करण्यास मदत मिळते. पोटॅशिअम लघवीतील आम्लता कमी करतं. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं.9 / 11तुळशीची पाने - तुळशीची पाने एक मूत्रवर्धक जड़ीबूटी मानली जाते. याने किडनी स्टोन दूर केला जातो आणि किडनीचं कामही याने सुधारतं. तुळशीमुळे रक्तातील यूरिक अॅसिडही कमी केलं जातं आणि किडनी निरोगी राहते. यातील तत्व जसे की, एसेंशिअल ऑइल किडनी स्टोन तोडतात आणि बाहेर काढतात.10 / 11खारीक - खारीक दिवसभर पाण्यात भिजवून खाल्ल्याने किडनीतील स्टोन बाहेर काढण्यास मदत मिळते. खारकामध्ये भरपूर फायबर असतं, जे किडनी स्टोनचा धोका कमी करतं. खारकामध्ये असलेलम मॅग्नेशिअम तत्व किडनीची सफाई करतं.े11 / 11सिंहपर्णी - सिंहपर्णीच्या मूळापासून बनलेल्या चहाचं सेवन किडनीची स्वच्छता करतं. सिंहपर्णी किडनीसाठी एक टॉनिकसारखं काम करतं. याने पचन सुधारतं आणि किडनीपर्यंत पोहचणारा कचरा कमी करण्यासाठी पित्ताचं उत्पादनही करतं. याशिवाय कॅनबेरी आणि बिटाची रसही फायदेशीर ठरू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications