Know the benefits of eating yogurt with empty stomach myb
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी रिकाम्यापोटी 'असं' करा दह्याचं सेवन.... By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 11:33 AM1 / 10दूध, दही आणि अन्य डेअरी उत्पादनांचे सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं. तुम्ही पाहिलं असेल की घरातून तुम्ही कोणतंही चांगलं काम करण्यासाठी बाहेर जात असता तेव्हा हातावर दही दिलं जातं.2 / 10चांगल्या आरोग्याचं प्रतिक असल्यामुळे हातावर दही दिलं जातं. दह्याचं सेवन हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. साधारणपणे दुपारी जेवताना किंवा कधीही खावसं वाटलं की लोकं दही खातात. पण तुम्हाला माहितही नसतील इतके फायदे दह्याचं सेवन केल्याने शरीराला होतात. दह्याचं सेवन शरीरासाठी खूप लाभदायक असतं. 3 / 10पोटात गॅस होत असेल तर दही खा- जर तुम्हाला पोटाचे विकार उद्भवत असतील तर दह्याचे सेवन करताना त्यात काळी मिरी आणि दालचीनी, काळी मिरी तसंच भाजलेलं जीरं घालून मग दह्याचं सेवन करा. त्यामुळे तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या जाणवत असेल किंवा गॅस झाला असेल तर या समस्येपासून आराम मिळतो.4 / 10रिकाम्यापोटी दही खाल्याने शरिराला अनेक फायदे होत असतात. शरीररातील उष्णता कमी करून शरीराला थंड वाटण्यासाठी दह्याचा आहारात समावेश केला जातो. 5 / 10दही एक असा पदार्थ आहे. जो कोणत्याही पदार्थासोबत खाल्यानंतर खूप चांगली चव येते. पण दाळीसोबत दह्याचं सेवन करू नये कारण त्यामुळे शरीराला कोणताही फायदा होत नाही. 6 / 10कोणत्या ऋतुत दही खाणं फायदेशीर आहे. -दही तुम्ही कोणत्याही ऋतुत खाऊ शकता. पण वातावरणात जास्त गारवा असेल आणि तुम्ही दह्याचं सेवन केलं तर नुकसानकारक ठरू शकतं. कारण त्यामुळे सर्दि, खोकला, ताप अशा लहान मोठ्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 7 / 10उपाशीपोटी दही खाण्याचे फायदे-दह्यात बॅक्टेरीया असतात. हे सगळ्याच माहित आहे. अनेकदा रिकाम्या पोटी दही खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. 8 / 10आतड्यांमध्ये असलेले बॅक्टेरीया आणि विषारीपदार्थ काढून टाकण्यासाठी रिकाम्यापोटी दही खायला हवे. त्यामुळे पोटाच्या विकारांपासून लांब राहता येतं.9 / 10गुडघेदुखी- प्रत्येक व्यक्ती दह्याचे सेवन करू शकतो. पण जर तुम्हाला गु़डघेदुखीचा त्रास असेल तर दह्यात काळीमिरी, काळं मिठ घालून दह्याचं सेवन करा. 10 / 10गुडघेदुखी- प्रत्येक व्यक्ती दह्याचे सेवन करू शकतो. पण जर तुम्हाला गु़डघेदुखीचा त्रास असेल तर दह्यात काळीमिरी, काळं मिठ घालून दह्याचं सेवन करा. आणखी वाचा Subscribe to Notifications