शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भिजवलेल्या बदामाचे फायदे सोडा, भिजवलेल्या आक्रोडाचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 10:43 AM

1 / 10
अक्रोड आपण कच्चा खाण्याऐवजी भिजवून खाल्ला तर अनेक फायदे मिळतील. त्यासाठी रात्री २ अक्रोड भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर त्याचे सेवन करा. अनेक आजारांपासून वाचण्यासाठी अक्रोडचे सेवन करणं गरजेचं आहे
2 / 10
शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना, जळजळ होत असेल किंवा सुज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावा आराम मिळेल.
3 / 10
हाडांना मजबूती देण्यासाठी अक्रोड फायदेशीर ठरत असतं.
4 / 10
अकरोडात पोटॅशियम, कॅल्शियम्, मॅग्नेशियम्, तांबे असे पोषक घटक असतात. यांचाही लाभ झाल्याने संधिवातालाही प्रतिबंध होण्यास मदत होते. अक्रोडामध्ये आणखी असे गुणधर्म आहेत ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील लवचिकता टिकून राहते. रक्तात गाठी होण्याचं प्रमाण कमी होतं.
5 / 10
मधुमेहापासून वाचण्यासाठी सुद्धा आक्रोड फायदेशीर ठरत असतं. अनेक रिसर्चमधून ही गोष्ट समोर आली आहे की रोज २ ते ३ बदाम खाल्ल्यामुळे डायबिटीस टाईप २ होण्याचा धोका कमी असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा अक्रोड फायदेशीर असतात.
6 / 10
अक्रोड रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी ठेवण्याचं काम करतं. तसेच पचनासाठीही मदत करतं. पोटाच्या समस्यांवरही अक्रोड फायदेशीर ठरतं. एका दिवसामध्ये 2 ते 3 अक्रोड खाल्याने वजन कमी होतं.
7 / 10
गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. पोटातील बाळाला पोषण पुरविण्यासाठी अक्रोड मदत करतं.
8 / 10
अक्रोड लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं.
9 / 10
शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना, जळजळ होत असेल किंवा सुज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावा आराम मिळेल.
10 / 10
तुमचं पोट साफ होत नसेल तर अक्रोडचे सेवन फायदेशीर ठरत असते. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थीत राहते. तसचं पोट साफ होण्यास अडथळा येत नाही.
टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स