शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कधीपर्यंत पोटाचा घेर आत घेऊन फोटो काढणार? 'हा' सोपा उपाय करून पोटावरील चरबी करा कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 10:45 AM

1 / 9
वजन कमी करण्यासाठी आज वेगवेगळे उपाय उपलब्ध आहेत. काही लोकांना नैसर्गिक उपायांनी वजन किंवा पोटावरील चरबी कमी करायची असते. खरंतर अनेकांना जिमला जायला किंवा एक्सरसाइज करायला कंटाळा येतो. अशात हे नैसर्गिक सोपे उपाय त्यांच्यासाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतात.
2 / 9
असाच एक नैसर्गिक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण या उपायाने लगेच पोटावरील चरबी कमी होणार नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेलच. हा उपाय म्हणजे पाण्यात जिरं टाकून सेवन करणे. जिरं हे एक वेट लॉस फूड आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही पोटवरील चरबी कमी करू शकता.
3 / 9
काही वर्षांआधी करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले होते की, जिरं खाल्ल्याने वजन १६ टक्के कमी होऊ शकतं. कारण जिऱ्यामध्ये नॅच्युरल प्लांट केमिकल्स फायटोस्टेरॉल्स असतं. जे बॅड कोलेस्ट्रॉलला दूर करण्याचं काम करतं. याने ट्रायग्लिसराइड्सचं विघटन होण्यासही मदत मिळते. ज्यामुळे शरीरात चरबीचं प्रमाण कमी होतं.
4 / 9
जिरं वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला वेगाने वाढवण्यासाठी मदत करतं. पण यासाठी जिऱ्याचा वापर योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे. जिऱ्यात फार कमी कॅलरी असतात. त्यासोबतच यात अॅंटी-इनफ्लेमेटरी प्रॉपर्टी सुद्धा असते आणि याने मेटाबॉलिज्मही सुधारतं. जिऱ्यामध्ये थायमोक्विनोन नावाचं एक तत्त्व असतं. याने शरीरातील फ्री रॅडिक्लसवर हल्ला केला जातो आणि त्यांना शरीरातून बाहेर काढलं जातं.
5 / 9
वजन केवळ डाएट आणि फार जास्त एक्सरसाइज करून कमी होत नसतं. वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्मची गति वाढवणं गरजेचं असतं. याचा अर्थ असा होतो की, वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्म वाढवणं गरजेचं आहे.
6 / 9
जिरं हे एक हाय मेटाबॉलिक फूड आहे. ज्याने शरीरात मेटाबॉलिज्म वाढतं आणि मजबूत होतं. मेटाबॉलिज्मची गती वाढली तर त्याचा थेट संबंध वजन कमी करण्याशी येतो. त्यामुळेच जिऱ्याचं सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होते.
7 / 9
एक चमचा जिरं २ ग्लास पाण्यात मिश्रित करा. यात एक छोटा आल्याचा तुकडा बारीक करून टाका आणि हे पाणी उकडू द्या. पाणी उकडल्यावर अर्ध शिल्लक राहील तेव्हा त्यात एक चिमुट वेलची आणि दालचिनी पावडर टाका. हे चांगल्या प्रकारे मिश्रित करून त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिश्रित करून सेवन करा.
8 / 9
एका रिसर्चनुसार, जर जिरं लिंबाच्या रसात मिश्रित करून सेवन केलं तर याने वजन कमी करण्यास मदत मिळते. जिरं किंवा जिऱ्यांचं पाणी सेवन केल्याने केवळ १५ ते २० दिवसात वजन कमी केलं जाऊ शकतं असा दावा अनेकजण करतात.
9 / 9
एका दुसऱ्या रिसर्चनुसार, ८० लठ्ठ महिलांना दोन गटात विभागण्यात आले होते. एका ग्रुपला रोज जिऱ्याचं सेवन करण्यास सांगितलं गेलं तर दुसऱ्या ग्रुपला डायटींगवर ठेवलं. शेवटी असं आढळलं की, ज्या महिलांनी जिऱ्याचं सेवन केलं, त्यांचं वजन आधीच्या तुलनेत कमी झालं होतं.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स