शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकापेक्षा जास्त सेक्शुअल 'पार्टनर' असतील तर कँन्सरचा असू शकतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 5:47 PM

1 / 6
कँन्सरचा धोका म्हातारपणात जास्त असतो. पण रिसर्चकर्त्यांनी पहिल्यांदाच कँन्सर आणि सेक्शुअल ट्रांसमिटेड इंफेक्शन (एसटीआई) यांच्यामधिल संबंध व्यक्त केला आहे.
2 / 6
ज्यात असं सांगितलं आहे की महिलांचे एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर असतील तर त्यांना कँन्सर होण्याचा धोका दुपटीने वाढतो. पुरूषांमध्ये या आजाराचा धोका दोन तृतीयांशने वाढतो.
3 / 6
एकापेक्षा जास्त पार्टनरच्या संपर्कात असल्यामुळे हा आजार वाढतो. शोधनकर्त्यांच्यामते एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असल्यामुळे किंवा धुम्रपान अधिक केल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत जातो.
4 / 6
शरीरसंबंध ठेवणं हे शारीरिक आणि मानसिक हेल्थसाठी फायदेशीर असतं पण जर महिला किंवा पुरूष एकपेक्षा जास्त पार्टनरसोबत शरीरसंबंध ठेवत असतील तर कँन्सरचा धोका वाढतो.
5 / 6
या अभ्यासासाठी कॅम्ब्रिजच्या एंग्लिया रस्किन विश्वविद्यायलयात सुमारे ६ हजार पुरूष आणि महिलांचा डेटा एकत्र करण्याता आला. यात सामाविष्ट असलेल्या लोकांचे वय सुमारे ५० च्या आसपास होते.
6 / 6
या संशोधनात दिसून आलं की ज्या पुरूषांच्या दहा पार्टनर आहेत त्यांना एक पार्टनर असलेल्या लोकांच्या तुलनेत कॅन्सर होण्याची शक्यता ६९ टक्क्यांनी जास्त होती. महिलांमध्ये कँन्सरचा धोका असण्याचे प्रमाण हे ९१ टक्के इतके होते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोग