शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचाल तर चक्रावून जाल, एकदा कराच मग बघा कमाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 3:32 PM

1 / 6
दररोज आंघोळ केल्याने मन आणि शरीर दोन्हीही निरोगी राहतात. सामान्य पाण्याने तर लोक नेहमीच आंघोळ करतात. पण असं सांगितलं जातं की, साल्ट बाथ म्हणजे मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचेही अनेक फायदे आहेत. मिठात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम, सोडिअम, सिलिकॉन, सल्फर, कॅल्शिअम ब्रोमाइन आणि स्ट्रोन्शिअम असतं. या सर्वामुळे शरीराला आराम मिळतो. जास्त थकवा जाणवत असल्याने मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर आराम मिळतो. चला जाणून घेऊ साल्ट बाथचे फायदे.....
2 / 6
मिठाचं पाणी आपल्या शरीरासाठी स्क्रबसारखं काम करतं. याने शरीराची डेड स्कीन आणि मळ साफ होतो. तसेच या पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या शरीराची घामाची दुर्गंधीच येणार नाही. त्यासोबतच पावसाळ्यात होणारे फंगल इन्फेक्शनही याने दूर होतं.
3 / 6
आंघोळीच्या पाण्यात एपसॉम मिठाचा वापर केला तर बॉडी डिटॉक्स होते. या मिठाने बॉडीतून टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत मिळते. या मिठासोबत तुम्ही पाण्यात सुगंधित तेलही टाकू शकता.
4 / 6
मिठात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअमही असतं. यामुळेच साल्ट बाथने बॉडीला आराम मिळतो. तसेच याने शरीरात ब्लड सर्कुलेशनही वेगाने होतं. वर्कआउटनंतर साल्ट बाथ घेण्याचा सल्ला दिला जातो. याने ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासही मदत मिळते.
5 / 6
साल्ट बाथ घेतल्याने डोकंही शांत राहतं. मन स्थिर राहतं. याने ह्यूमन ब्रेन चांगलं फंक्शन करू लागतं. शरीरात होणारी वेदना दूर करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करा. याने तुमची अंगदुखी लगेच दूर होईल.
6 / 6
ज्या लोकांच्या शरीर आणि चेहऱ्यावर फार जास्त ऑइल येतं. अशा लोकांना या साल्ट बाथचे खूप सारे फायदे होतात. तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांनी नक्की मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी. (टिप - हा लेख तुमची सामान्य माहिती वाढवण्यासाठी आहे. मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा एकदा आवर्जून सल्ला घ्या.)
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी