know the symptoms, causes, remedies of migraine
साधी डोकेदुखी वाटते तितकी साधी नाही, जास्त काळ असल्यास असू शकतो 'हा' जीवघेणा आजार By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 5:55 PM1 / 10मायग्रेन म्हणजे असह्य डोकेदुखी होते. मायग्रेन असल्यास काहीवेळा डोक्याचा अर्धा भाग दुखतो तर, कधीकधी पूर्ण डोकंही (Headache) दुखायला लागतं.2 / 10मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आधी त्याची कारणं ओळखणं महत्त्वाचं आहे. डोकं दुखत असेल तर, दुर्लक्ष करण्यापेक्षा नेमकं कोणत्यावेळी डोकं दुखायला लागतं हे ओळखाणं गरजेचं आहे. 3 / 10पुरुषांच्या तुलनेत महिलांना मायग्रेनचा त्रास जास्त होतो. तज्ज्ञांच्या मते महिलांच्या मायग्रेनमध्ये मेन्स्टुअल सायकलची महत्त्वाची भूमिका असते. काही महिलांना पिरेडच्या काळात मायग्रेनचा त्रास होतो. पाळीच्या काळात प्रोजेस्टेरॉन आणि एस्टेरॉन हार्मोन्समधील चढउतार मायग्रेनला ट्रिगर करतात.4 / 10मायग्रेनची अनेक कारणं आहेत. तीव्र प्रकाश आणि गोंगाट हे देखील मायग्रेनचे कारण ठरु शकते. अशावेळेस शांत ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केल्यास आराम मिळेल. घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी आराम करण्याचा प्रयत्न करा.5 / 10न खाणं किंवा जास्त वेळ उपाशी राहण्यानेही मायग्रेन होतो. तज्ज्ञांच्या मते हेल्दी डाएटसाठी वेळ द्यायला हवा. ऑफिस मध्ये जेवायला वेळ देता येत नसेल तर, जवळ काही स्नॅक्स किंवा ड्रायफ्रुट ठेवावेत. भूक लागल्यावर जेवायला वेळ नसेल तर, थोडंथोडं खात रहावं.6 / 10महिन्यातले १६ दिवस मायग्रेन होत असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिकेशन घ्यावं.यासाठी काही इंजेक्शन्सही आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.7 / 10तणावामुळे मायग्रेन वाढण्याची अधिक शक्यता असते. दैनंदिन जीवनात अनेक समस्या आणि चिंताना तोंड द्यावे लागते. म्हणूनच नियमित मेडीटेशन करा. योगा आणि व्यायामामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल.8 / 10पुरेशी झोप घ्या. झोपमोड होणार नाही याची दक्षता घ्या. यासाठी झोपण्यापूर्वीच आजूबाजूचे वातावरण शांत ठेवण्यासाठी घरच्यांना विनंती करा.9 / 10दररोज कमीत कमी 12-15 ग्लास पाणी प्या. रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.10 / 10तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे योगासने आणि प्राणायमाचा सराव करा. शिवाय झोपताना अथवा झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनीटे केलेल्या मेडीटेशनमुळे तुम्हाला निवांत वाटू लागेल. यासाठी ही काही योगासने अवश्य करा. आणखी वाचा Subscribe to Notifications