शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' संकेत इशारा देतात की, तुमच्या आतड्यांमध्ये आहे काहीना काही गडबड; वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 12:35 PM

1 / 10
आजकाल सर्वच वयोगटातील लोकांना पचनासंबंधी समस्या बघायला मिळतात. आजकालची बेजबाबदार लाइफस्टाईल, धावपळ, चुकीच्या वेळेवर चुकीचे पदार्थ खाण्याच्या सवयींमुळे ही पचनासंबंधी समस्या होते. ज्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या डोकं वर काढतात. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे तर पचनशक्ती कमजोर होते.
2 / 10
व्यक्तीच्या शरीरात प्रत्येक अवयवाचं आपलं एक वेगळं महत्व आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीरात मेंदूचं काम असतं. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या शरीरात आतड्यांचं महत्व असतं. प्राण पॉइंट्सच्या संस्थापक डिंपल जांगडा यांचं मत आहे की, आतड्यांची काळजी घेणं म्हणजे शारीरिक आणि भावनात्मक आरोग्य दोन्ही गोष्टींची काळजी घेणं. याचं कारणण ७० टक्क्यांपेक्षा जास्त सेरोटोनिन म्हणजे हॅपी हार्मोन्स हृदय किंवा मेंदूत नाही तर आतड्यांमध्ये तयार होतात.
3 / 10
आयुर्वेदानुसार, चांगल्या आरोग्याचा मंत्र चांगला आहार आहे. जर पचनक्रिाय व्यवस्थित असेल तर शरीर आणि मन दोन्ही चांगल्याप्रकारे काम करतात. द कादम्ब ट्रीच्या को-फाउंडर आणि आय़ुर्वेदीक चिकित्सक डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आतड्यांसंबंधी महत्वाची माहिती शेअर केली आहे.
4 / 10
डॉ. दीक्षा यांनी सांगितलं की, कशाप्रकारे आतड्यांचं आरोग्य महत्वाचं आहे. आतड्या केवळ अन्न पचन करत नाही तर आपल्या भावनांना प्रोसेस करून शरीराच्या इतर अवयवांची देखभाल करतात. इतकंच नाही तर त्या सांगतात की, आतड्यांचं आरोग्य चांगलं नसलं तर हेच सर्व आजारांचं मूळ कारण ठरतं.
5 / 10
डॉक्टरांनुसार, चिंतेपासून ते तणावापर्यंत, पुरेसं जेवण न करणे आणि व्यायाम कमी करणे याने आरोग्य बिघडतं. भूकेपेक्षा जास्त जेवण आणि जेवणाच्या वेळेत अनियमितता, पौष्टिक आहार न घेणं याने पचनक्रिया बिघडते. त्यासोबतच उपवास ठेवल्याने किंवा उपाशी राहिल्याने आतड्यांवर वाईट प्रभाव पडतो.
6 / 10
डॉक्टरांचं असं मत आहे की, स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी खाताना फक्त खा आणि खेळताना फक्त खेळा हा नियम फॉलो केला पाहिजे. डॉ. दीक्षा यांनी आतड्यांमध्ये काही गडबड झाली तर कोणती लक्षणे दिसतात याबाबत सांगितलं आहे.
7 / 10
जर एखाद्या व्यक्तीच्या पोटात सतत जडपणा किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असेल, जुलाब किंवा दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा टॉयलेटला जात असाल, तोंडाची स्वच्छता करूनही श्वासांची दुर्गंधी येत असेल तर याचा अर्थ असा आहे की, आतड्यांमध्ये समस्या आहे.
8 / 10
तसेच जर तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा वाढण्याचा विचार करत असाल, पण मेहनत करूनही यश मिळत नसेल तर याचं कारण तुमच्या आतड्या योग्यप्रकारे काम न कऱणं हे असू शकतं.
9 / 10
जर तुम्हाला एनर्जेटीक वाटत नसेल किंवा सतत थकवा जाणवत असेल तर कुठे ना कुठे याला तुमच्या आतड्या जबाबदार आहेत. त्यासोबतच अनियमित पिरियड्स, एक्ने म्हणजे पिंपल्स किंवा त्वचेसंबंधी काही समस्या असेल तर यालाही आतड्यांचं बिघडलेलं आरोग्य कारणीभूत असू शकतं.
10 / 10
डॉ. भावसार सांगतात की, निरोगी आतड्यांमधून तुम्हाला, हॅपी हार्मोन, कमी तणाव, पोषक तत्व, चांगली झोप, चांगली स्मरणशक्ती, चमकदार त्वचा, चमकदार केस, निरोगी आतड्या या सर्व गोष्टी मिळतील. त्या सांगतात की, तुम्हाला तुमच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करण्याची गरज आहे. यात खाण्याची सवय, झोपण्याची पद्धत, व्यायाम, तणावापासून दूर राहणे यांचा समावेश आहे. आपल्या आतड्या निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी बस इतकंच करायचं आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स