शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Black Fungus: ...तर मास्कमुळेच तुम्हाला ब्लॅक फंगसचा धोका; जाणून घ्या कसा कराल बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 3:51 PM

1 / 10
देशातील कोरोना रुग्णांची कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे.
2 / 10
मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा अडीच लाखांच्या खाली आली आहे. मात्र ब्लॅक फंगसचा धोका वाढला आहे.
3 / 10
डोळे, नाक यांना लक्ष्य करणारा ब्लॅक फंगस आजार आता थेट मेंदूवर वार करू लागला आहे. ब्लॅक फंगसमुळे देशात सव्वाशेहून अधिक जणांचा जीव गेल्यानं काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे.
4 / 10
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क घातला जातो. मात्र याच मास्कमुळे ब्लॅक फंगसचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
5 / 10
कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेस मास्कच्या माध्यमातूनही ब्लॅक फंगसचा धोका आहे. ब्लॅक फंगस डोळ्यांमधून प्रवेश करत नाही. तो नाकावाटे शरीरात जातो. तिथून तो डोळ्यांवर, मेंदूंवर परिणाम करतो, अशी माहिती मॅक्स हेल्थकेअरच्या औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. निशेष जैन यांनी दिली.
6 / 10
ब्लॅक फंगस नाकावाटे पुढे सरकतो. डोळे, मेंदूवर आघात करत असल्यानं तो जीवघेणा ठरतो. ब्लॅक फंगस नाकावाटे प्रवेश करत असल्यानं मास्कबद्दल संशय व्यक्त होत आहे. एकच मास्क बरेच दिवस वापरणं ब्लॅक फंगसला निमंत्रण ठरू शकतं, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
7 / 10
एकच मास्क बरेच दिवस स्वच्छ न करता वापरल्यास त्यात फंगस तयार होतं. ही बुरशी अतिशय सूक्ष्म असल्यानं ती डोळ्यांना दिसत नाही. त्यासाठी मायक्रोस्कोपची आवश्यकता असते, असं डॉ. जैन यांनी सांगितलं.
8 / 10
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता सगळेच मास्कचा वापर करतात. सध्याच्या घडीला मास्क वापरणं गरजेचंच आहे. मात्र तो योग्यरित्या आणि योग्य स्वरुपात वापरणं गरजेचं आहे. अन्यथा कोरोनापासून वाचवणारा मास्क ब्लॅक फंगसचं कारण ठरू शकतो, असं जैन म्हणाले.
9 / 10
एकच मास्क अनेक दिवस वापरणं योग्य नाही. ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे मास्क बदलत राहायला हवं. साधा मास्क असो वा एन-९५, तो सातत्यानं बदलत राहायला हवं, असं आवाहन डॉ. जैन यांनी केलं.
10 / 10
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं अनेकांनी डबल मास्क वापरण्यास सुरुवात केली. यापैकी एक सर्जिकल मास्क असतो. सर्जिकल मास्क पुन्हा पुन्हा वापरणं ब्लॅक फंगसचं कारण ठरू शकतं. त्यामुळे मास्क वापरत असताना तो स्वच्छ आहे ना, याची खात्री करून घ्यायला हवी.
टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या