शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठ्यातला मोठा किडनी स्टोन तोडते ही डाळ, लघवीद्वारे सहज येईल बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:07 IST

1 / 8
Kidney Stone : किडनी स्टोनची समस्या अलिकडे वेगवेगळ्या लोकांना होतात. किडनीची स्वच्छता करून किडनी स्टोनची समस्या रोखली जाऊ शकते. आयुर्वेदात किडनी डिटॉक्स करण्यासाठी आणि किडनी स्टोन काढण्यासाठी एकापेक्षा एक उपाय सांगितले आहेत. या उपायाने तुम्ही 6 mm साइजचा स्टोनही बाहेर काढू शकता.
2 / 8
किडनी स्टोनचं कारण - किडनी किंवा लघवीच्या मार्गात अडकलेल्या टणक पदार्थाला स्टोन म्हटलं जातं. दगडासारखा दिसणारा हा पदार्थ सोडिअम आणि मिनरल जमा झाल्याने तयार होतो. हाय यूरिक अॅसिडमुळेही किडनी स्टोन होतो आणि ही स्थिती वेदनादायी असते. सामान्यपणे डॉक्टर स्टोन काढण्यासाठी सर्जरी करण्याचा सल्ला देतात. पण काही घरगुती उपायांनीही तुम्ही स्टोन बाहेर काढू शकता.
3 / 8
6 mm चा स्टोनही घरगुती उपायाने निघतो - इंटरमाउंटेन हेल्थकेयरनुसार, 4 mm पर्यंतचा 80 टक्के स्टोन आपोआप निघून जातो. तेच 6 mm पर्यंतचे 60 टक्के किडनी स्टोन घरगुती उपायांनी काढता येतात. यापेक्षा जास्त साइजचा स्टोन घरगुती उपायांनी काढणं अवघड असतं.
4 / 8
स्टोन निघण्यास किती दिवस लागतात? - एक्सपर्ट्सनुसार, 4 mm चा स्टोन नॅच्युरल पद्धतीने निघण्यासाठी सरासरी 31 दिवस आणि 6 mm चा किडनी स्टोन निघण्यास सरासरी 45 दिवसांचा वेळ लागू शकतो.
5 / 8
मोठा स्टोनही तोडते ही डाळ - आयुर्वेदात कुळीथ डाळ किडनी स्टोन दूर करण्याचा उपाय सांगितली आहे. यात ड्यूरेटिक गुण असतात. जे किडनीमध्ये अडकलेली घाण लघवीच्या प्रेशरसोबत बाहेर काढतात.
6 / 8
कुळीथ डाळीचे फायदे - ही डाळ खाल्ल्याने फायबर, प्रोटीन, आयरन, फॉस्फोरस, व्हिटॅमिन सी मिळतं. हे पोषक तत्व ब्लड शुगर, भूक, हाडांची मजबुती कंट्रोल करण्यास मदत करतात.
7 / 8
वेदना दूर करण्याचे उपाय - जेव्हा किडनी स्टोन लघवीच्या मार्गातून जातो तेव्हा खूप जास्त वेदना होऊ शकते. यासाठी तुम्ही डॉक्टरांकडून चांगलं पेन किलर औषध घेऊ शकता.
8 / 8
किडनी साफ करण्यासाठी ड्रिंक - किडनी डिटॉक्स करूनच किडनीमध्ये जमा होणारी घाण रोखली जाऊ शकते. या विषारी तत्वांमुळेच किडनी स्टोन तयार होतो. यासाठी तुम्ही काही हर्बल ड्रिंकचं सेवन करू शकता.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य