lancet study on diabetes funded by icmr said 101 million indians are diabetec
"टाईमबॉम्बसारखी परिस्थिती"; भारतात Diabetes वर सर्वात मोठं संशोधन, धडकी भरवणारे आकडे By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 10:26 AM1 / 14भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, एका नवीन संशोधनात भयावह आकडेवारी समोर आली आहे. भारत झपाट्याने जगाची 'मधुमेहाची राजधानी' बनत असल्याचं म्हटलं आहे.2 / 14द लॅन्सेटच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, भारतात 10.1 कोटी लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत. अभ्यासात असं म्हटलं आहे की, गेल्या चार वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 44% वाढ झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 3 / 14The Lancet Diabetes and Endocrinology Journal मध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यास इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-इंडिया डायबिटीज (ICMR-INDIAB) द्वारे केला गेला आहे, ज्यामध्ये भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर आलं आहे.4 / 14अभ्यासात असे म्हटलं आहे की, 2019 मध्ये भारतात मधुमेहाचे सात कोटी रुग्ण होते, आता या संख्येत 44% ने वाढ झाली आहे. संशोधनानुसार भारतातील 15.3% लोकसंख्या प्री-डायबिटीज आहे. भविष्यात मधुमेह होण्याच्या जोखमीला प्री-डायबिटीज म्हणतात. हा आकडा मधुमेहाबाबतच्या आधीच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे, त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ चिंतेत आहेत.5 / 14वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अंदाज व्यक्त केला होता की भारतातील सुमारे 7.7 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त असतील, तर संशोधनात मधुमेहाच्या रुग्णांची वास्तविक संख्या 10.1 कोटी असल्याचे समोर आले आहे. WHO ने अंदाज केला होता की 2.5 कोटी प्री-डायबिटीज असतील परंतु वास्तविक आकडा यापेक्षा खूप मोठा आहे.6 / 14मधुमेहावर केलेले हे संशोधन 10 वर्षे चालले, याला भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे सर्वेक्षण म्हटले जात आहे. मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनने हे संशोधन करण्यासाठी ICMR ला मदत केली आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील लोक त्यात सहभागी झाले होते.7 / 14द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, संशोधनाचे प्रमुख लेखक आणि मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रंजित मोहन अंजना म्हणाले, 'ही परिस्थिती टाईमबॉम्बसारखी आहे. जर तुम्ही प्री-डायबेटिक असाल तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. प्री-डायबेटिक असलेल्या 60 टक्के लोकांना पुढील पाच वर्षांत हा आजार होतो.8 / 14भारतात गोव्यात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. गोव्यातील 26.4% लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्यानंतर पुद्दुचेरी (26.3%) आणि केरळ (25.5%) यांचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 4.8% मधुमेही रुग्ण आहेत, परंतु येथील सुमारे 18% लोक प्री-डायबेटिक आहेत, जो एक मोठा धोका आहे.9 / 14संशोधनात असे म्हटले आहे की, सध्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मधुमेहाचे प्रमाण कमी आहे, परंतु त्याचवेळी या राज्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढण्याचा धोका असल्याचेही म्हटले आहे. .10 / 14डॉ. अंजना सांगतात की, ज्या राज्यांमध्ये मधुमेहाचे रुग्ण कमी आहेत, तेथे प्री-डायबेटिसचे रुग्ण जास्त आहेत. बंगळुरूच्या साक्रा वर्ल्ड हॉस्पिटलचे डायबेटीस आणि एंडोक्राइनोलॉजीचे संचालक डॉ.मंजुनाथ मळींगे सांगतात की, देशात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढतील. 11 / 14ते म्हणतात, 'मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची अनेक कारणे आहेत जसे की अनहेल्दी जीवनशैली, लठ्ठपणा आणि तणाव. आगामी काळात महिला आणि पुरुष दोघांमध्ये मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढणार आहे.12 / 14मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. जेव्हा शरीर पुरेसे इंसुलिन संप्रेरक तयार करू शकत नाही किंवा इन्सुलिन योग्यरित्या वापरू शकत नाही तेव्हा असे होते. इन्सुलिन हे स्वादुपिंडाने बनवलेले हार्मोन आहे जे कार्बोहायड्रेट्सच्या विघटनातून तयार झालेल्या ग्लुकोजला ऊर्जेसाठी वापरण्यास मदत करते.13 / 14वारंवार लघवी होणे, पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा जाणवणे, वारंवार भूक लागणे, वजन कमी होणे, दृष्टी कमी होणे आणि अस्पष्ट दिसणं, जखमा हळूहळू बऱ्या होणे ही मधुमेहाची मुख्य लक्षणं आहेत. योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने आपण अनेक आजारांचा धोका कमी करू शकतो. 14 / 14मधुमेह हा अनुवांशिक कारणांमुळे देखील होतो, त्यामुळे काहीवेळा त्याला प्रतिबंध करणे कठीण होते, परंतु सावधगिरी बाळगून आपण त्याचा धोका कमी करू शकतो. रोज अर्धा तास चालण्यानेही मधुमेहाचा धोका कमी होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications