शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cancer: खाण्याच्या 'या' चुकीच्या सवयीमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 10:46 AM

1 / 8
रात्री उशीरा जेवण करण्याची सवय माणसाला मोठ्या अडचणीत टाकू शकते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरच्या एका रिपोर्टनुसार, रात्री उशीरा जेवण केल्याने लोकांना ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जास्त राहतो. हा रिसर्च एका खाण्या-पिण्याच्या सवयीच्या एका अशा डेटावर आधारित आहे ज्यात लोकांना झोप आणि जेवणाच्या वेळेबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.
2 / 8
कोणत्या लोकांना अधिक धोका - अभ्यासकांनी या रिसर्चमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या ६२१ केसेस आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या १२०५ केसेसवर लक्ष केंद्रीत केलं होतं. ज्यात ८७२ पुरूष आणि १३२१ महिलांचा समावेश होता. यानंतर या लोकांच्या झोपेचा आणि खाण्या-पिण्याच्या सवयीची तुलना सामान्य लोकांच्या सवयींसोबत केली गेली.
3 / 8
जेवूण लगेच झोपणाऱ्यांनी सावधान - अभ्यासकांनी या रिपोर्टमध्ये दावा केलाय की, रात्री जेवणानंतर लगेच झोपणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका अधिक राहतो. रात्री जेवणानंतर दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ जास्त जागणाऱ्यांमध्ये ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका २० टक्के कमी आढळून आला. रात्री उशीरा जेवण करणाऱ्यांच्या टायमिंगबाबतही अभ्यासकांनी धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे.
4 / 8
रात्री कधी जेवणं सुरक्षित - अभ्यासकांनी रात्री ९ वाजताच्याआधी डिनर करणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांचं मत आहे की रात्री १० वाजतानंतर डिनर करणाऱ्यांमध्ये ९ वाजताच्या आधी जेवण करणाऱ्यांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका जास्त राहतो.
5 / 8
ही आकडेवारी फूड आणि कॅन्सरवरील अभ्यासात शरीराच्या इंटरनल क्लॉक किंवा स्कार्डियन रिदम्सच्या महत्वावर जोर देते. कॅन्सरला आळा घालण्यासाठी फूडसंबंधी शिफारशी लागू करण्याची गरज आहे. ज्यात न केवळ त्यांच्या प्रकारवर तर त्यांच्या क्वालिटीवरही लक्ष देणं गरजेचं आहे.
6 / 8
या रिसर्चचे मुख्य अभ्यासक डॉ. मनोलिस कोजेविनास सांगतात की, 'जर हे निष्कर्ष निश्चित झाले तर याने कॅन्सरला आळा घालण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो खासकरून त्या लोकांसाठी जे रात्री अवेळी जेवण करत नाही'. या रिसर्चचा प्रभाव दक्षिण यूरोपसारख्या काही संस्कृतींसाठी महत्वपूर्ण होऊ शकतो जिथे लोकांना रात्री उशीरा जेवण करण्याची सवय असते.
7 / 8
'मेडिकल न्यूज टुडे'च्या एका रिपोर्टनुसार, खाण्याच्या सवयींमुळे कॅन्सरचा धोका कमी किंवा जास्त होऊ शकतो. खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असल्याने हे माहीत करून घेणं कठिण असतं की, डाएटमधील कोणत्या पदार्थाने कॅन्सरचा धोका वाढतो.
8 / 8
एक्सपर्ट सांगतात की, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, शुगर ड्रिंक्स, अल्ट्रा प्रोसेस्ड सूप किंवा मीट, अल्कोहोल, धुम्रपान आणि हाय प्रोटीन डाएटनेही कॅन्सरचा धोका राहतो. त्यासोबतच असे फूड प्रोडक्ट्स ज्यात शुगर, रिफायनरी तेल किंवा फॅटचं प्रमाण अधिक जास्त असतं, ज्याने कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यResearchसंशोधन