शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : चिंताजनक! सौम्य लक्षणं असतील तरी सावध व्हा; 77% लोकांमध्ये दिसली 'ही' आरोग्य समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 2:27 PM

1 / 12
जगभरात कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. आतापर्यंत जगभरात कोट्यवधी लोकांना लागण झाली असून लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच लाखो लोकांनी कोरोनावर मात देखील केली. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
2 / 12
आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बरं झालेल्या लोकांमध्ये देखील अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचा धोका दिसून येत आहे. लाँग कोविडची समस्या अनेक लोकांमध्ये वर्षभरापासून कायम असल्याचं दिसून आलं आहे.
3 / 12
नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये संशोधकांनी सांगितलं की, कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये अनेक प्रकारचे आरोग्याबाबतचे धोके दिसून येत आहेत, ज्यांना संसर्गादरम्यान सौम्य लक्षणं होती, त्यांच्यामध्येही अनेक प्रकारच्या समस्या कायम आहेत.
4 / 12
मोठ्या संख्येने लोक रुग्णालयात येत आहेत जे संसर्गातून बरे झाले आहेत परंतु तरीही त्यांना आरोग्य समस्या आहेत. कोरोनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम शोधण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनात तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या लोकांनाही दीर्घकाळ झोपेचा त्रास होत असल्याचं दिसून येतं.
5 / 12
संसर्गाला बळी पडलेले बहुतेक लोक निद्रानाश किंवा झोपेशी संबंधित इतर अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असल्याचं आढळून आलं आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला.
6 / 12
रिपोर्टनुसार, कोरोनामुळे झोपेसंबंधीचे आजार होऊ शकतात, असा इशाराही यापूर्वीच्या अभ्यासात दिला होता, परंतु ही प्रकरणे गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये जास्त होती ज्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. या रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की सौम्य लक्षणांनी ग्रस्त असलेल्या लोकांना झोपेची समस्या देखील असू शकते.
7 / 12
फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये यासंबंधीचा एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे, ज्यामध्ये कोरोना संसर्गाने ग्रस्त लोकांमध्ये झोपेसंबंधीत विकारांबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे संशोधन 1,056 कोरोना रूग्णांवर केले गेले, मात्र हे लोक रुग्णालयात दाखल झाले नव्हते.
8 / 12
या लोकांमध्ये निद्रानाश, नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्यांचं मूल्यांकन करण्यात आलं. संशोधकांना आढळलं की यापैकी 76.1% निद्रानाश आणि 22.8% गंभीर निद्रानाशीची समस्या होती.
9 / 12
एक तृतीयांश लोकांनी सांगितलं की, त्यांच्या झोपेचा कालावधी कमी होता किंवा त्यांना झोपताना त्रास होत होता. निम्म्या लोकांनी संसर्ग झाल्यानंतर रात्री कमी झोप घेतल्याचं सांगितलं.
10 / 12
संशोधकांनी सांगितले की, अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांना आधीच नैराश्य किंवा तणावाची समस्या होती त्यांना निद्रानाश होण्याचा धोका जास्त असतो. डायबेटीस, हार्ट आणि मेटाबॉलिझम समस्यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्येही या प्रकारचा धोका दिसून येतो.
11 / 12
तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, कोरोनामधून मधून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये निद्रानाशाची समस्या दीर्घकाळ राहिल्यास त्याचा आरोग्यावर इतर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. इतर आजारांचा धोका वाढतो. सर्चच्या निष्कर्षात, तज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आम्ही पोस्ट कोविडच्या अनेक प्रकारच्या समस्या पाहत आहोत.
12 / 12
आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की ज्या लोकांमध्ये गंभीर लक्षणं आहेत त्यांच्यामध्ये लाँग कोविडचा धोका जास्त असतो, परंतु या संशोधनात सौम्य लक्षणं असलेल्या लोकांमध्येही अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दिसून येतात. त्यामुळे वेळेत उपचार घेणं आवश्यक आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य