leak proof bamboo bottles rapidly getting popularity
पर्यावरणस्नेही बांबूच्या बाटल्या पाहिल्यात का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 2:11 PM1 / 6तांब्याच्या, मातीच्या बाटल्यांनंतर आता बांबूच्या बाटल्या बाजारात येऊ लागल्या आहेत. आसाममध्ये राहणाऱ्या धिर्तीमान बोरा नावाच्या व्यक्तीनं बांबूच्या बाटल्यांची निर्मिती केली आहे.2 / 6बोरा यांनी तयार केलेल्या बांबूच्या बाटल्या १०० टक्के लिक-प्रूफ आहेत. दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी बोरांनी बांबूच्या बाटल्या तयार करण्यावर भर दिला. 3 / 6बांबूच्या बाटलीतून पाण्याची गळती होऊ यासाठी बोरा यांनी जवळपास १७ वर्षे त्यावर काम केलं. 4 / 6बांबूच्या बाटल्यांना वॉटरप्रूफ पॉलिश देण्यात आलं आहे. या बाटलीचं झाकणदेखील बांबूपासूनच तयार करण्यात आलं आहे. 5 / 6बांबूच्या बाटल्यांमध्ये पाणी अतिशय थंड राहतं. अगदी कडाक्याच्या उन्हातही या बाटलीतलं पाणी गार राहतं.6 / 6बांबूची एक बाटली तयार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो. बांबूच्या बाटलीची किंमत ४०० ते ६०० रुपयांना मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications