lifestyle foods you must avoid if you are on medication
औषधं घेताय?; मग 'या' पदार्थांपासून राहा दूर By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 3:31 PM1 / 6आजारी असल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. डॉक्टरही लवकर बरं व्हावं यासाठी काही औषधं देतात. मात्र औषधं घेताना काही पदार्थांपासून लांब राहणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. हे पदार्थ कोणते जाणून घेऊया. 2 / 6काही औषधं ही गरम द्रव्यासोबत घेणं चांगलं नसतं. चहा, कॉफी किंवा अनेक गरम वस्तूंसोबत औषधं घेऊ नका. 3 / 6संत्र, लिंबू, द्राक्ष अशा आंबट फळांच्या रसाचं सेवन करू नका. तसेच औषधं घेताना लोणचं, चिंच अशा ही आंबट गोष्टीही खाऊ नका. 4 / 6केळ्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असल्याने ते शरीरासाठी चांगलं असतं. मात्र ब्लडप्रेशरची औषधं घेताना केळ खाऊ नका. 5 / 6औषधांचं सेवन केल्यावर लगेचच दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करू नका कारण यामुळे रिअॅक्शन होऊ शकते. 6 / 6औषधं घेतल्यावर चुकून सुद्धा सोडा अथवा कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करू नका. शरीरासाठी असं करणं घातक ठरू शकतं. आणखी वाचा Subscribe to Notifications