शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थंडीत 'हा' स्पेशल चहा आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 2:28 PM

1 / 9
चहानेच अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. काहींना तर चहा घेतल्याशिवाय काम करण्याची तरतरी येत नाही, असे म्हणतात. चहाचे काही फायदे देखील आहेत. चहामध्ये तणाव दूर करण्याचे घटक असतात. चहामुळे थकवा, आळस दूर निघून जातो.
2 / 9
दूधाच्या चहा इतकाच कोरा चहा, पुदीना, लेमन टी, आल्याचा चहा असे वेगवेगळ्या प्रकारचे चहा शरीरासाठी बदलत्या हवामानानुसार फायदेशीर असतात. मात्र जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
3 / 9
थंडीच्या दिवसात गरम चहाचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडतो. चहामधील तुळस आणि आलं सर्दी खोकल्याच्या आजारापासून दूर ठेवते. गुळाचा चहा ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
4 / 9
आधुनिक जीवनशैलीतील सध्या चहाला मोठे महत्त्व आले आहे. साखरे ऐवजी गुळाचा चहा हा शरीरासाठी उत्तम आहे. यामुळे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते.
5 / 9
साखरेपेक्षा गुळामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात गुळाचा चहा घेणं उत्तम आहे.
6 / 9
डोकेदुखी आणि मायक्रेनच्या त्रासावर देखील गुळाचा चहा गुणकारी ठरतो. यामुळे आराम मिळतो.
7 / 9
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गुळ खाणं किंवा गुळाचा चहा फायदेशीर ठरतो. तसेच पचन संस्थाही उत्तम राहते.
8 / 9
गुळाचा चहा हा चांगला असतो. मात्र अधिक प्रमाणात गुळाचं सेवन करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
9 / 9
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.)
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य