lifestyle superfoods in diet to keep heart healthy
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश नक्की करा By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 1:36 PM1 / 12बदलत्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. हृदयरोगाचा धोका वाढत आहे. 2 / 12खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, दुर्लक्ष करणे यामुळे अनेकदा आरोग्य बिघडते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा हे जाणून घेऊया. 3 / 12ब्रोकली ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. शरीरातील नुकसानकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. 4 / 12व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, व्हिटॅमिन के, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, पोटॅशिअम, मॅगनीज, फॉस्फोरससारखे तत्व असतात. त्यामुळे याचा नियमित आहारात समावेश केल्याने रक्त शुद्ध राहण्यासोबतच वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होतो. 5 / 12बेरीजमध्ये अनेक पोषक घटक असतात. अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाणही अधिक असते. तसेच कॅलरीचे प्रमाण कमी असून फायबरचे प्रमाण अधिक असते. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करतात. 6 / 12स्टॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी यासारख्या सर्व प्रकारच्या बेरीज हृदयासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात बेरीजचा समावेश असावा. 7 / 12फ्लॅक्ससीड्समध्ये फायबर, पोटॅशियम, ओमेगा 3 चे प्रमाण हे अधिक असते दे हृदयासाठी उपयुक्त ठरते. डायबेटीस आणि हायपरटेंशनचा धोकाही यामुळे कमी होतो. 8 / 12ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. 9 / 12हृदयासंबंधित आजारांसाठीही अक्रोड परिणामकारक ठरतं. स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं. 10 / 12दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन आढळून येतं. दूधाच्या तुलनेत दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.11 / 12दही हृदयासंबंधित आजारांसाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. दह्याचे सेवन दररोज केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. 12 / 12आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. आणखी वाचा Subscribe to Notifications