शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Monkeypox : धोक्याची घंटा! कोरोनाप्रमाणेच आता मंकीपॉक्सला घाबरण्याची गरज; झपाट्याने होतोय प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:37 AM

1 / 10
कोरोना महामारीप्रमाणेच आपल्याला मंकीपॉक्सच्या धोक्याला घाबरण्याची गरज आहे. आता जगातील अनेक देशांमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या मंकीपॉक्समुळे पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. भारतही या धोक्याबाबत सतर्क झाला आहे.
2 / 10
मंकीपॉक्स व्हायरस हा जगभरातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पब्लिक हेल्थ इमर्जेन्सी घोषित केली आहे. WHO ने त्याला ग्रेड 3 कॅटेगरीत ठेवलं आहे. याचा अर्थ धोका मोठा असल्याने ते थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील.
3 / 10
मंकीपॉक्समुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना व्हायरस ज्याप्रकारे पसरला होता, तसाच आता मंकीपॉक्स पसरत असल्याची माहिती मिळत आहे.
4 / 10
मंकीपॉक्स हा व्हायरसअद्याप भारतात दाखल झालेला नाही. पण तरीही सतर्क राहण्याची अत्यंत गरज आहे. हा व्हायरस आता पीओकेमध्ये पोहोचला आहे. काँगो, रवांडा, युगांडा, बुरुंडीसह केनियामध्ये यावर्षी मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार खूप वेगाने झाला आहे.
5 / 10
हा व्हायरस आफ्रिकेतून प्रथम स्वीडन, नंतर पाकिस्तान आणि आता फिलिपाइन्समध्ये पसरला आहे. आतापर्यंत स्वीडनमध्ये मंकीपॉक्सचे १, पाकिस्तानमध्ये ४ आणि फिलिपाइन्समध्ये १ केस आढळून आली आहे.
6 / 10
आतापर्यंत हा व्हायरस आफ्रिकन देशांमध्ये झपाट्याने पसरला आहे. पण यावेळी हा व्हायरस आफ्रिकन देशांमधून बाहेर पडत आहे आणि इतर देशांमध्येही पसरत आहे. शेजारील देश पाकिस्तानमध्येही या विषाणूचे चार रुग्ण आढळून आले आहेत.
7 / 10
पीओकेमध्ये राहणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीमध्ये मंकीपॉक्स या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. ही व्यक्ती नुकतीच सौदी अरेबियातील जेद्दाहून पाकिस्तानात परतली होती.
8 / 10
पीओकेमध्ये या व्हायरसचं आगमन हे भारतासाठीही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भारत सरकारही पूर्ण अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नुकतीच मंकीपॉक्सच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
9 / 10
मंकीपॉक्सबाबत सर्व राज्यांनी खबरदारी घ्यावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. देशातील सर्व विमानतळ, बंदरे आणि ग्राउंड क्रॉसिंगवर आरोग्य सुविधा वाढवल्या पाहिजेत. आयसोलेशन आणि मॅनेजमेंटच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात.
10 / 10
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मंगळवारी सांगितलं की, ते सध्या MPox वर लस विकसित करण्यावर काम करत आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम एका वर्षात मिळतील अशी आशा आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य