list of tasty foods which you should avoid for healthy life
खाण्यासाठी स्वादिष्ट पण शरीरासाठी हानिकारक आहेत 'या' गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 4:29 PM1 / 7काही जण खाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी खातात. खाद्यपदार्थांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. चमचमीत पदार्थ खाणं सर्वांनाच आवडतं मात्र यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. खाण्यासाठी स्वादिष्ट पण शरीरासाठी हानिकारक ठरणाऱ्या काही गोष्टींबाबत जाणून घेऊया. 2 / 7फास्टफूड हे सर्वांच्याच आवडीचं आहे. मात्र फास्टफूडमध्ये प्रिजर्व्हेटिव्ह आणि मोनो सोडियम ग्लूटामेट तत्त्व असतात ज्यांच्यापासून किडनीला धोका पोहचू शकतो. तसेच कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते. 3 / 7आपण दररोज चहा, कॉफी, सरबत यासारख्या पेयाच्या माध्यमातून साखरेचं सेवन करत असतो. मात्र साखरेमुळे शरीराला नुकसान पोहचू शकतं. 4 / 7मीठामुळे खाद्यपदार्थांना चव येते. मात्र जास्त प्रमाणात मीठाचा वापर केल्यास ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता ही अधिक असते. 5 / 7मशरूम अनेकांना आवडतं. मात्र मशरूममध्ये कार्सिनोजेनिक कंपाऊंड असतात ज्यामुळे कॅन्सरचा धोका असतो. 6 / 7कोल्ड ड्रिंक्समध्ये फास्फोरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते. यामुळे विविध आजारांचा धोका संभवतो. 7 / 7फ्रोजन फूडमध्ये आर्टीफिशिअल कलर्स आणि प्रिजर्व्हेटिव्हचा वापर केला जातो. यामुळे हार्ट अटॅक आणि कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणखी वाचा Subscribe to Notifications