Liver Damage Symptoms : 5 tips to keep liver healthy
पोटाला किंवा इथे स्पर्श करून कळेल लिव्हर खराब होतंय, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; लगेच करा ही 5 कामे By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:44 PM1 / 8Liver Damage Treatment: जर लिव्हर खराब झालं तर अन्न पचवणारे बाइल, गरजेचे प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल, एनर्जी स्टॉरेज इत्यादींची कामे थांबतात. ही कामे इतकी महत्वाची आहेत की, शरीर यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे या अवयवाला निरोगी ठेवणं आणि गंभीर आजारांपासून वाचणं गरजेचं आहे.2 / 8सामान्यपणे लिव्हर डिजीज जे असतात ते सायलेंट पद्धतीने विकसित होतात आणि नंतर लिव्हर फेल होतात. पण तरीही याची काही लक्षण सुरूवातीच्या स्टेजमध्येच दिसतात. जे ओळखून लिव्हर पूर्णपणे खराब होण्यापासून रोखलं जाऊ शकतं.3 / 8NIDDK नुसार, जेव्हा लिव्हरमध्ये काही समस्या होते तेव्हा काही संकेत दिसतात. जसे की, पोटाच्या वरच्या भागात स्पर्श केल्यास वेदना, पोटात पाणी भरणे, भूक न लागणे, थकवा जाणवणे, त्वचा निळी पडणे, तळपाय आणि पायांवर सूज येणे, खाज येणे, लघवीचा रंग बदलणे, डोळे पिवळे पडणे इत्यादी.4 / 8जर तुम्हाला वर दिलेली लक्षण दिसली तर किंवा लिव्हर खराब झालं का याची माहिती मिळवायची असेल तर सगळ्यात आधी डॉक्टरांना भेटा. त्यांना तुमच्या समस्यांबाबत सांगा. लिव्हर टेस्ट करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.5 / 8लिव्हर खराब होण्याच सगळ्यात मोठं कारण म्हणजे फॅटी लिव्हर डिजीज आहे. ज्याचा धोका दारू प्यायल्याने अधिक वाढतो. त्यामुळे हेल्दी लिव्हर ठेवण्यासाठी आणि आजार दूर ठेवण्यासाठी दारूचं सेवन लगेच बंद करा.6 / 8मेयो क्लीनिकनुसार, लिव्हर हेल्थ सुधारण्यासाठी काही फूड्सचं सेवन बंद केलं पाहिजे. ज्यात रेड मीट, ट्रान्स फॅट, प्रोसेस्ड कार्ब्स आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप इत्यादी आहेत. हे पदार्थ लिव्हरला खराब करतात आणि लिव्हर फेलिअरचं कारण बनू शकतात.7 / 8कोणतेही अवयव निरोगी ठेवण्यासाठी एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला या आजारांपासून बचाव करण्यासाठी आठवड्यातून 3 ते 4 वेळ 30 ते 60 मिनिटे इंटेसिव्ह एक्सरसाइज करायला हवी.8 / 8जर तुमचं वजन जास्त असेल किंवा पोट निघालं असेल तर लिव्हरला वाटवण्यासाठी कॅलरीवर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही दररोज 500 ते 1000 हजार कॅलरी कमी केल्या पाहिजे. जेणेकरून वजन कमी होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications