शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Lockdown: सावध व्हा! लॉकडाऊन संपल्यावर रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये ही चूक करू नका; नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 2:18 PM

1 / 10
कोरोना महामारीची (Corona Virus) दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. यामुळे विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन (Traveling after Lockdown) उठू लागला आहे. महाराष्ट्रातही 15 जूनला तर काही जिल्ह्यांमध्ये 8 जूनपासून लॉकडाऊन शिथिल होण्यास सुरुवात होणार आहे. राज्यात अनलॉक (Corona Unlock) प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. अशावेळी रिक्षा, एसी-नॉन एसी टॅक्सी, एसटी, बस याद्वारे प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच आणखी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. (Corona Risk while travel in Riksha, Taxi, Bus after Lockdown.)
2 / 10
जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या दोन संशोधकांनी 'भारतात कोरोना महामारीवेळी सार्वजनिक वाहतुकीवेळचा धोका' यावर अभ्यास केला आहे. पोस्ट डॉक्टोरल फेलो दर्पण दास आणि प्रो. गुरुमूर्ति रामचंद्रन यांचे हे संशोधन एनव्हायरन्मेंट रिसर्चमध्ये छापून आले आहे. (Do's and Don's after Lockdown revoke))
3 / 10
यामध्ये ऑटो, नॉन एसी, एसी टॅक्सीमध्ये ड्रायव्हरसोबत प्रवाशांची संख्या ही 5 गृहीत धरण्यात आली आहे. तसेच यामध्ये श्वासोच्छवास दर हा 0.49 ते 1 m3/तास मानण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाचा धोका हा सर्वच वाहने उभी असताना नोंदविला गेला आहे.
4 / 10
रिसर्चनुसार जर ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह 5 लोक बसलेले असतील आणि यापैकी एकाला कोरोना असेल तर इतर लोकांना कोरोन होण्याची शक्यता बसच्या तुलनेत कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रिक्षेमध्ये हवेचा प्रवाह जास्त असणे आहे.
5 / 10
रिक्षेतून प्रवास करणे तुलनेने सुरक्षित आहे. मात्र, यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच रिक्षेतून प्रवास करताना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे.
6 / 10
रिसर्चनुसार बसमध्ये जर 40 लोक असीतल तर व्हेंटिलेशन कमी असल्याने त्या लोकांना कोरोना संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे. रिक्षेच्या तुलनेत हा धोका 72 टक्क्यांनी वाढतो. सर्व वाहनांमध्ये हवेतील कोरोना संक्रमित कण हे एकसारखेच असल्याचे मानले गेले आहे.
7 / 10
या एअरोसोलमध्ये कोरोना आहे, यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क असला तरीदेखील व्हेंटिलेशन नसल्याने कोरोना संक्रमण पसरविण्यासाठी कारणीभूत आहे. यासाठी बसच्या खिडक्या उघड्या ठेवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.
8 / 10
नॉन एसी टॅक्सीमध्ये व्हेंटिलेशन काचा पूर्णपणे उघडल्यास जास्त प्रमाणावर होऊ शकते. बसच्या तुलनेत कोरोना संक्रमणाची शक्यता ही 14 पटींनी आणि रिक्षाच्या तुलनेत 86 पटींनी अधिक आहे. जर काचा उघड्या असल्यास कोरोना संक्रमणाची शक्यता ही 250 टक्क्यांनी कमी होते. यामुळे टॅक्सी असेल तर काचा उघड्या ठेवून प्रवास करावा.
9 / 10
दुसरीकडे एसी टॅक्सी ही रिक्षा, बस आणि नॉन एसी टॅक्सीपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे समोर आले आहे. हा धोका जवळपास 300 पटींनी जास्त आहे. कारण एसी टॅक्सीमध्ये व्हेंटीलेशन शून्याच्या बरोबर असते.
10 / 10
जर टॅक्सी 100 पेक्षा जास्त वेगात असेल तर कोरोना संक्रमणाचा धोका हा 75 टक्क्यांनी कमी होतो. यामुळे खूपच गरज असेल तर एसी टॅक्सीचा वापर करावा.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकBus Driverबसचालकauto rickshawऑटो रिक्षाTaxiटॅक्सी