शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Long Covid Symptoms: बापरे! बरं झाल्यावरही कोरोना पाठ सोडेना, महिलांना लाँग कोविडचा मोठा धोका; 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 8:29 AM

1 / 10
देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.
2 / 10
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 1.4 लाखांवर पोहोचली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. परंतु, रुग्ण बरे झाल्यानंतरही कोरोना त्यांची पाठ सोडत नसल्याचं दिसून आलं आहे.
3 / 10
महिला आणि पुरुषांमध्ये लॉंग कोविडची वेगवेगळी लक्षणं दिसून येत आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना लाँग कोविडचा अधिक त्रास होत असून लक्षणंही वेगवेगळी दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
4 / 10
कोरोनातून बरं झाल्यानंतरदेखील अनेक रुग्णांमध्ये दीर्घ काळ लक्षणं दिसत आहेत. ही लक्षणं लाँग कोविडची मानली जात आहेत. या अनुषंगाने कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींवर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं.
5 / 10
संशोधनात लाँग कोविडला पुरुषांपेक्षा महिला जास्त बळी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. महिलांना दीर्घ काळापर्यंत कोविड सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता असते, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
6 / 10
'करंट मेडिकल रिसर्च अ‍ॅंड ओपिनियन' या पीअर-रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनातून महिलांमध्ये कोरोना व्हायरसची दीर्घकालीन लक्षणं दिसून येण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत 22 टक्क्यांपर्यंत जास्त असते, असं दिसून आलं आहे.
7 / 10
सर्वसामान्यपणे थकवा, डोकेदुखी, एकाग्रता कमी होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, सांधेदुखी ही लाँग कोविडची लक्षणं आहेत. याशिवाय ब्रेन फॉग, शरीर सुन्न होणं, मुंग्या येणं, आतड्यांची समस्या, अनिद्रा, कानात आवाज येणं, चक्कर येणं आणि दृष्टी अंधुक होणं यांसारखी काही लक्षणं लाँग कोविड झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात.
8 / 10
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये दिसून येणारी लाँग कोविडची लक्षणं काहीशी वेगळी आहेत. पुरुषांमध्ये डायबेटीस, किडनी विकार, फुफ्फुसांशी संबंधित त्रास, शरीर सुन्न होणं, मुंग्या येणं, सांधेदुखी, छातीत दुखणं अशी लक्षणं कोरोनानंतरही दिसून येतात.
9 / 10
या संशोधनात लाँग कोविडची लक्षणं पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळी दिसून आली. महिलांमध्ये प्रामुख्यानं मूड ऑफ होणं, डोकेदुखी, त्वचेशी संबंधित समस्या, पचनासंबंधी तक्रारी, थकवा आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल विकार ही लाँग कोविडची लक्षणं दिसून येतात.
10 / 10
कोरोनातून बरं झाल्यानंतर सर्वांनीच आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. काही समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य