शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नखावर दिसून येतं लंग कॅन्सरचं हे लक्षण, दुर्लक्ष करणं बेतू शकतं जीवावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:47 AM

1 / 8
Lung Cancer Early Symptoms: खोकला, श्वास घेण्यास त्रास हे लंग म्हणजे फुप्फुसाच्या कॅन्सरची मुख्य लक्षणं मानली जातात. पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, नखं बघूनही तुम्ही या आजाराबाबत माहीत करून घेऊ शकता.
2 / 8
कॅन्सरचे कॉमन प्रकार - कॅन्सर हा एक जीवघेणा आहे. हा आजार जगभरातील जास्तीत जास्त मृत्यूचं कारण असतो. तसे तर कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण सगळ्यात जास्त ब्रेस्ट, कोलन, रेक्टम, प्रोस्टेट आणि लंग कॅन्सरच्या केसेस बघायला मिळतात. कारण यामागील सगळ्यात मोठं कारण अनहेल्दी लाइफस्टाईल असते.
3 / 8
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, 2020 मध्ये लंग कॅन्सरमुळे सगळ्यात जास्त रूग्णांचा जीव गेला. तर यावर्षी जगभरात साधारण 18 लाख लोकांनी फुप्फुसाच्या कॅन्सरमुळे जीव गमावला.
4 / 8
लंग कॅन्सरची लक्षण - लंग कॅन्सरच्या रूग्णाला सतत खोकल्याचा सामना करावा लागतो. त्याशिवाय श्वास घेण्यास समस्या, छोतीत वेदना, खोकल्यातून रक्त येणे, भूक न लागणे, आवाजात बदल होणे, वजन अचानक कमी होणे, नेहमी थकवा राहणे, खांद्यात वेदना होणे यांचा समावेश आहे.
5 / 8
नखांमधूनही मिळतो लंग कॅन्सरचा संकेत - लंग कॅन्सरची माहिती नखांच्या माध्यमातूनही घेऊ शकता. एनसीबीआयच्या एका शोधानुसार, नेल क्लबिंगच्या 80 टक्के केसेसमागे लंग कॅन्सर कारण असतो. जे शरीरातील ऑक्सिजनची कमतरता दाखवतात.
6 / 8
नेल क्लबिंगचा अर्थ - नखं फोल्ड होणं किंवा वाकडी होण्याला नेल क्लबिंग म्हटलं जातं. हा बोटांच्या नखांमध्ये येणारा बदल आहे. ज्यामुळे नखं पसरट, सूजलेले आणि वाकलेली दिसतात.
7 / 8
कशी होते याची सुरूवात? - क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, नेल क्लबिंगची माहिती मिळवणं सुरूवातीला अवघड होतं. नख हळूहळू बोटाच्या मूळापासून निघून येतं आणि सैल होतं. जेव्हा तुम्ही त्याला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला जाणवतं की, ते केवळ मुलायम मासावर टिकून आहे.
8 / 8
नखं वाकडी होण्याची इतर कारणे - लंग कॅन्सरसोबतच फुप्फुसाचे इतर आजार, फॅमिली हिस्ट्री, सीलिएक डिजीज, लिव्हर सिरोसिस आणि हायपरथायरॉइडमुळेही नखं वाकडी होऊ लागतात.
टॅग्स :cancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य