शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फोटो काढताना पोट आत खेचाल तर फुप्फुसं होतील खराब, त्याऐवजी करा हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 11:29 AM

1 / 8
How To Look Slim: बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या कारणाने लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. पोट बाहेर आल्याने चारचौघात लाज वाटू लागते. तर अनेकजण फोटो काढताना पोट आत खेचतात. मात्र, पोटावर विनाकारण दबाव टाकू नये. भलेही तुम्हाला फोटोत बारीक दिसायचं तरीही. असं केल्याने फुप्फुसं आणि आतड्या खराब होऊ शकतात. फोटो काढताना असं काही करण्याऐवजी तुम्ही वेगळे उपाय करू शकता.
2 / 8
यादगार क्षण फोटोत कैद केले जातात आणि सगळ्यांनाच फोटोत परफेक्ट दिसायचं असतं. यासाठी बेली फॅट असलेले लोक श्वास रोखून पोट आत घेतात. हे फारच कॉमन आहे, पण असं करणं शरीरासाठी नुकसानकारक आहे. असं करून तुम्ही थोड्या वेळासाठी बारीक होऊ शकता, पण तुमच्या पोटाच्या मसल्सवर प्रेशर पडतं.
3 / 8
फुप्फुसं होतील कमजोर - एका रिपोर्टनुसार, पोट आत खेचल्याने डायफ्रामची नॅचरल मुव्हमेंट कमी होते. यामुळे श्वास घेण्याची क्षमताही कमी होऊ लागते. ज्यामुळे हळूहळू फुप्फुसाची कॅपेसिटीही कमी होते.
4 / 8
पोश्चर होईल खराब - पुन्हा पुन्हा असं पोट दाबल्याने पोश्चर बिघडतं. यादरम्यान शरीराचं लक्ष पोट सांभाळण्याकडे लागतं आणि नॅचरल शेपपासून भटकतं. याकारणाने असहजता, थकवा आणि कंबरदुखी होऊ शकते.
5 / 8
पचनक्रिया बिघडते - पोट आत खेचल्याने आतड्या दबतात ज्यामुळे पचनक्रिया थांबते. चांगल्या डायजेशनसाठी अवयवांना रिलॅक्स आणि आरामदायक स्थिती पाहिजे. त्यामुळे कधीच अशी चूक करू नका.
6 / 8
सुरू करा हे काम - पोट आत घेण्याऐवजी आपल्या डाएटवर लक्ष द्या. आहारात ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, फायबर, हेल्दी फॅट्स, प्रोटीनचा समावेश करा. अनप्रोसेस्ड, हाई फॅट, जंक फूड, शुगर टाळा.
7 / 8
एक्सरसाइज महत्वाची - शरीरातील चरबी दूर करण्यासाठी एक्सरसाइज करणं फार महत्वाचं आहे. याने मसल्स टोन होतात आणि फॅट बर्न करण्यास मदत मिळते. यामुळे शक्ती आणि कार्डियो फंक्शन चांगलं होतं. त्वचेवर ग्लो येतो.
8 / 8
इंटरमिटेंट फास्टिंग - Johns Hopkins नुसार इंटरमिटेंट फास्टिंगने वजन कंट्रोल केलं जाऊ शकतं. ही एक हेल्दी प्रॅक्टिस आहे जी कॅलरी बर्निंग आणि कंट्रोलमध्ये महत्वाची भूमिका निभावते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स