Make this nutritious breakfast the start of the day
कशासाठी पोटासाठी... 'या' पौष्टिक नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 1:22 PM1 / 7दिवसाची सुरुवात करताना आरोग्याचा विचार करून अल्पोपहार करणं गरजेचं आहे. उपाशीपोटी दिवसाची सुरुवात केल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. म्हणून जर तुम्ही नाश्ता न करता घाईघाईत घराबाहेर पडत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. त्यासाठीच आम्ही तुम्हाला पटकन होणाऱ्या काही नाश्ताच्या रेसिपीज सांगणार आहेत. 2 / 7१) ब्रेडला टोस्ट करून त्यावर केळ्याचे काप ठेवावेत आणि त्यावर तीळ भुरभुरावेत. चहाबरोबर किंवा कॉफीबरोबर हा नाश्ता तुम्ही कधीही करू शकता.3 / 7२)दुधामध्ये नारळाचा रस, दही, द्राक्षे आणि केळं यांचं मिश्रण एकत्रित करून सकाळी लवकर प्यावं. जेणेकरून पचनसंस्था नियमित होईल. 4 / 7३)आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व फळे कापून त्यावर मध घालावा आणि ते सॅलेडसारखं खावं. त्यामुळे भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे मिळतील.5 / 7४)ब्रेडवर टोमॅटोचे, काकडीचे, बिटाचे काप ठेवावे व त्यावर चीज किसून सॅन्डविचसारखं खावं. यामुळे भरपेट नाश्ता होईल.6 / 7५)बदाम आणि अक्रोड यांचे बारीक तुकडे दुधात मिसळून प्यावं. या पौष्टिक पेयामुळे तुमची पचनसंस्था चांगली होईल आणि आरोग्यही उत्तम राहील.7 / 7६)दह्यामध्ये आपल्या घरात उपलब्ध असलेली फळे एकत्र करून त्यात साखर किंवा मध घालून खाल्ल्यास तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications