शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुळशी लग्नच्या निमित्ताने विकत आणलेल्या आवळ्यांपासून वर्षभरासाठी बनवा 'हे' चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 1:55 PM

1 / 4
कृती : प्रथम आवळे स्वच्ध धुवून कोरडे करून किसून घ्यावे. १वाटी आवळ्याचा किस असल्यास अर्धी वाटी साखर घालून मंद आचेवर आटवावं. नंतर त्यात सुंठपूड व वेलची पूड घालावी. काचेच्या बाटलीत भरून ठेवावा. टीप : जास्त गोड हवा असल्यास पाऊण वाटी किंवा बरोबरीने साखर वापरावी. जसे की आवळा किस १वाटी : साखर १वाटी!
2 / 4
कृती : प्रथम आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून चाळणीवर वाफवावे. थंड झाल्यावर बी काढावी. तेल गरम करून त्यात मेथीदाणे परतून त्याची पूड करावी. परातीत तिखट, मीठ, हळद, मोहरीची डाळ/ मोहरीची पूड व मेथीपूड एकत्र कालवून घ्यावी. तेल कडकडीत गरम करून त्यात लवंग व काळीमीरी तळून काढून घ्यावी व परातीतील मिश्रणात घालावी. नंतर त्यात भरपूर हिंग घालून ती गरम फोडणी परातीत ओतून मिश्रण लगेच कालवावं. गरम तेलाने तिखट, हळदीचा कच्चेपणा जातो. लगेच कालवल्याने तिखट जळत नाही. मिश्रण थंड झाल्यावर त्यात आवळ्याच्या फोडी कालवाव्या. मस्त लोणचं तयार. हे लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवावं.
3 / 4
कृती : आवळे किसून त्यात मीठ व थोडी साखर घालावी. तेलात मेथीदाणे तळून पूड करावी. त्याच तेलात लवंग व काळीमिरी तळून काढून घ्यावी. मोहरीची डाळ, तिखट, हळद मेथीपूड, तळलेली लवंग व काळीमिरी एकत्र कालवावी. तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग व थोडी हळद घालून फोडणी करावी. गॅस बंद करावा. फोडणी जरा कोमट असताना लोणच्याच्या खारात घालावी. खार नीट कालवून तो किसलेल्या आवळ्यात घालावा.
4 / 4
कृती : प्रथम आवळे व आलं स्वच्छ धुवून पुसून घेतले. आवळे व आलं किसणीवर किसून घेतले. जीरं व ओवा किंचित गरम करून मिक्सरमध्ये फिरवून घेतला. जरा जाडसरच ठेवले. आवळ्याचा किस, आलं, ओवा, जीरं व काळमीठ एकत्र कालवून ताटात पसरवून सावलीतच वाळवलं. छान वाळल्यावर चवदार पाचक सुपारी तयार. टीप : सुपारी उन्हात वाळवली तर काळसर रंग येतो. सावलीत वाळवलीतर रंग बदलत नाही.
टॅग्स :Healthy Diet Planआहार योजनाfoodअन्न