शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोमोज खाता खाता घशात अडकला, घुसमटून मृत्यू; एम्सने जारी केला इशारा, सावधान...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 3:35 PM

1 / 10
रस्त्याच्या शेजारी, चायनिजच्या गाड्यांवर आता मोमोज खाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. हे मोमोज व्हेज, नॉनव्हेज असतात. हा एक मोदकासारखाच प्रकार असतो. परंतू या मोमोज खाण्यामुळे दिल्लीत एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे.
2 / 10
मोमोज लाल तिखट चटणीसोबत दिला जातो. ७०-८० रुपयांत हे ८-१० मोमोज मिळतात. जिभेचे चोचले पुरविणारे तर याचे दिवाने झाले आहेत. परंतू दिल्लीतील धक्कादायक घटनेमुळे हे मोमोज देखील जिवघेणे ठरू शकतात, हे समोर आले आहे. यामुळे एम्सने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. तुम्ही देखील मोमोजचे शौकिन असाल तर याकडे एकदा लक्ष द्या...
3 / 10
एम्सने सांगितले की, दिल्लीत ५० वर्षीय व्यक्तीचा मोमोज खाताना मृत्यू झाला आहे. त्याची वैद्यकीय चाचणी केली तेव्हा त्याच्या श्वासनलिकेत एक मोमो अडकल्याचे आढळले. यामुळे त्याचा घुसमटून मृत्यू झाला. मोमोजा अडकल्याने न्यूरोजेनिक कार्डिएक अरेस्ट (Neurogenic cardiac arrest) आला आणि त्याचा मृत्यू झाला.
4 / 10
एम्सच्या तज्ज्ञांनी यावर अॅडवायझरी दिली आहे. यामध्ये सांगितले की, मोमोज गुळगुळीत आणि चिकचिकीत असतात. जर मोमोज नीट चावला गेला नाही तर तो घास गिळताना व्यक्तीचा श्वास गुदमरू शकतो. यामुळे मोमोज नीट चावून खावा.
5 / 10
मोमो हे आशियातील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक आहे. मोमोज हे गोलाकार आकारात असतात, काहीवेळा छोट्या करंजीसारख्या आकारात असतात. बाहेरून पीठ आणि आतमध्ये कुस्करलेले पदार्थ असतात. ते उकडवलेले किंवा तळलेले असतात. मुख्यत्वे हे पीठ मैद्याचे असते.
6 / 10
मोमोजच्या वरचा थर हा मैद्याचा असतो. मैद्यात मिसळलेल्या ब्लीच रसायनांमुळे स्वादुपिंडाचे मोठे नुकसान होते, ज्यामुळे इन्सुलिन निर्मिती क्षमतेवर परिणाम होतो.
7 / 10
मोमोजमध्ये वापरलेली भाजी आणि चिकन जास्त वेळ ठेवल्यास खराब होतात. अशा पदार्थांपासून बनवलेल्या मोमोजचे सेवन केल्यास आजारपण येण्याची शक्यता आहे.
8 / 10
लाल मिरची आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते, पण जर त्या लाल मिरचीमध्ये प्रक्रिया करून काहीही घातलं नसेल तरच. मोमो विकणारे गुणवत्ता न पाहता या मिरचीची चटणी विकत घेतात. त्यात रसायनेही असतात. अशी चटणी खाल्ल्याने मूळव्याध, पोटाचे विकार आदी होण्याची शक्यता असते.
9 / 10
मोमोज चवदार बनण्यासाठी त्यात मोनो-सोडियम ग्लुटामेट (MSG) मिसळले जाते. ही पावडर लठ्ठपणाचा धोका वाढविते. मज्जातंतूचे विकार, घाम येणे, छातीत दुखणे, मळमळ आणि हृदयाची गती वाढविण्याचे देखील ही पाडवर काम करते.
10 / 10
मोमोमध्ये कोबीचे स्टफिंग असते, जे योग्य प्रकारे शिजवले नाही तर टेपवर्म असू शकतात, जे मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. हे सारे पाहून मोमोज खाताना एकदा विचार करा, ते किती धोकादायक आहेत ते.
टॅग्स :foodअन्नfood poisoningअन्नातून विषबाधा