mask alone cannot protect you from corona virus reveals study
CoronaVirus News: ...तर मास्कदेखील तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकणार नाही; महत्त्वाची माहिती समोर By कुणाल गवाणकर | Published: December 24, 2020 2:30 PM1 / 10कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुण्याचं, मास्क लावण्याचं, सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केलं जात आहे. 2 / 10अनेक जण घराबाहेर पडताना मास्क वापरत नाहीत. कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यानं मास्क घालण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 3 / 10बरेच जण मास्क घालून गप्पा मारताना दिसतात. मास्क घातला असल्यानं आपल्याला कोरोना होणार नाही, असा विश्वास त्यांना वाटतो. मात्र यात तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.4 / 10एआयपीमध्ये प्रकाशित झालेल्या फिजिक्स ऑफ फ्ल्यूड्समध्ये संशोधकांनी मास्कबद्दलच्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे.5 / 10तुम्ही मास्क घालत असाल, मात्र फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसाल, तर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.6 / 10संशोधकांनी विविध प्रकारच्या पाच मास्कचं परीक्षण केलं. मास्क घालून खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर उडणारे शिंतोडे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात, याचा अभ्यास संशोधकांनी केला.7 / 10मास्क परिधान केले असतानाही खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर आसपासच्या व्यक्तींवर शिंतोडे उडतात. आसपासच्या व्यक्तींपर्यंत किती शितोंडे पोहोचतील, याची संख्या मास्कच्या दर्जावर अवलंबून असते.8 / 10दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांपेक्षा कमी अंतर असल्यास खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर तोंडातून बाहेर येणाऱ्या शिंतोड्यांमुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो.9 / 10मास्क कोरोनापासून संरक्षण करतो. पण व्यक्ती एकमेकांच्या जवळ असल्यास मास्क घालता असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो, असं न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठाचे एसोशिएट प्रोफेसर कृष्णा कोटा यांनी सांगितलं.10 / 10केवळ मास्कमुळे कोरोनापासून संरक्षण होणार नाही. तर त्यासोबत फिजिकल डिस्टन्सिंगचंदेखील पालन करावं लागेल, असं कोटा म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications