Massage of feet will get rid of many diseases
नियमित करा पायांना मालिश; 'या' समस्या होतील दूर By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 8:14 PM1 / 7जेव्हा तुम्ही दिवसभराच्या धावपळीनंतर घरी परतता आणि तुम्हाला फार थकवा येतो. त्यावेळी जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पायांना मालिश केली तर त्यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा नाहीसा होण्यासाठी मदत होते. तसचे अनेक आजारांपासूनही तुमचा बचाव होतो. जाणून घेऊया पायांची मालिश केल्यामुळे होणारे फायदे...2 / 7नियमितपणे मालिश केल्याने शरीरातील हाडांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. 3 / 7रात्री झोपण्यापूर्वी पायांना मालिश केल्याने अनिद्रेची समस्या दूर होते आणि तुम्हाला शांत झोप लागते. त्याचबरोबर शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं त्यामुळे स्ट्रेस लेव्हर फार कमी होते. 4 / 7मालिश केल्याने पायांच्या स्नायूंच्या वेदना नाहीशा होतात आणि पायांना आराम मिळतो.5 / 7तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, जर तुम्ही नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी पायांना मालिश केली तर त्यामुळे पायांचे सर्व टॉक्सिन्स शरीराबाहेर निघून जातात. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. 6 / 7जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी पायांना मसाज करता त्यावेळी मेटाबॉलिज्म वाढतं. त्यामुळे लठ्ठपणाची समस्याही दूर होते. 7 / 7जर पायांना व्यवस्थित मसाज केल तर त्यामुळे एनर्जी लेव्हल वाढते. आणखी वाचा Subscribe to Notifications