शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुरुषांनी 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, असू शकतात घातक आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 3:07 PM

1 / 10
इरेक्टाइल डिसफंक्शन - बऱ्याचश्या पुरुषांमध्ये ही समस्या जाणवते. प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट जोसेफ अलुकल यांनी द हेल्दी वेबसाइटला सांगितले की तुम्हाला इरेक्टॉल डिसफंक्शनची लक्षणं जाणवत असतील तर हे ब्लड फ्लो कमी होण्याचे लक्षण असू शकते ज्याचा प्रभाव तुमच्या हृदय आणि मेंदु सोबतच शरीराच्या इतर भागांवर पडण्याची शक्यता आहे.
2 / 10
गिळायला त्रास होणे- गिळायला त्रास होत असेल तर हे डिस्फेजियाचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. हे कोणत्याततरी गंभीर अ‍ॅलर्जी अथवा अ‍ॅसोफाजाल कॅन्सरचे लक्षणं असु शकते.
3 / 10
अचानक वजन कमी होणे- जर तुमचं वजन डाएट आणि व्यायामामुळे कमी होत असेल तर ते ठिक आहे पण समजा ते वजन अचानक खुप कमी झाले तर ही चिंतेची बाब असू शकते. अशावेळी तुम्हाला काही टेस्ट करणे गरजेचे आहे.
4 / 10
बाऊल सिंड्रोम- डॉक्टर्सचे असे म्हणने आहे की तुम्हाला बाऊल सिंड्रोमचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. तर हे कॉलन कॅन्सरचे लक्षण असू शकते. अशावेळी तुम्ही त्वरित डॉक्टरकडे संपर्क करा.
5 / 10
झोपेची समस्या- तुम्हाला जर अतिनिद्रा किंवा कमी झोपेची समस्या सतावत असेल तर हा घातक आजार असू शकतो. हे डिप्रेशनचे लक्षण असू शकते ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, डायबिटीस याचे लक्षणं असू शकते.
6 / 10
वजन वाढणे- वेगाने वजन वाढणे हे एका गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी नुसार जर तुमचे वजन अचानक वाढत असेल तर तुम्हाला हृदयरोगाचा धोका असू शकतो.
7 / 10
खुप जास्त खाज येणे- जर तुम्हाला सतत खाज येत असेल तर ही त्वचेशी संबधित समस्या असू शकते. अशावेळी तुम्हा डर्मिटोलॉजिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. जास्त दिवस खाजेची समस्या असणे हे लिम्फोमा, मल्टीपल माइलोमा आणि डायबिटीसचे लक्षण असू शकते.
8 / 10
युरीन संबधी आजार- ऑनकोटारगेटमध्ये छापलेल्या संशोधनानुसार युरीन करताना त्रास होणे, लघवीतून रक्त पडणे प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला चांगलेच महागात पडेल.
9 / 10
त्वचा अथवा डोळे पिवळे पडणं- हेल्थ एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार त्वचा पिवळी पडणे किंवा डोळे पिवळे पडणे हे कावीळचे लक्षण असू शकते. वेळीच लक्ष दिले नाही तर हे पॅनक्रिएटीक कॅन्सरचे लक्षण असू शकते.
10 / 10
हृदयावर दबाव येणे हे हार्टअटॅकचे लक्षण असू शकते हे सर्वांना माहित आहे. पण दात, किंवा जबड्यांचे दुखणे हेही हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. डॉक्टर याकडे वेळीच लक्ष द्यायचा सल्ला देतात. ज्यामुळे वेळीच या आजारावर नियंत्रण मिळवता येते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स