शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mental Health: खूप त्रासलेले, वैतागलेले आहात? काहीच मनासारखे घडत नाहीये? मग 'हे' घ्या परिणामकारक उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:49 AM

1 / 8
कितीही दोषारोप करा,आपण किती निर्दोष आहोत हे जगाला पटवून द्या,बाकीचे किती नालायक आहेत हे ओरडून सांगा, काहीही करा,बदल मात्र तुम्ही स्वतःमधे करत नाही तोवर होत नाही! परिस्थितीचा दगड टिचभर जागा सोडत नाही ती तशीच रहाते Take your own time ! कधी सुरुवात करायची,कधी उठून उभं रहायचं,कधी कामाला सुरुवात करायची हा निर्णय तुमचा असतो.स्वतःसाठी स्वतःलाच उभं रहावं लागतं.
2 / 8
व्यक्ती/परिस्थिती बदलेल,एक दिवस चमत्कार होईल,देवदूत मदतीला धावून येतील,आकाशातून पहाणा-या देवाला माझी दया येईल,नशिब बदलेल,ग्रह बदलतील,शत्रूच मरतील... कशाची वाट बघू नका,यात वेळ वाया घालवू नका.कामाला लागा.
3 / 8
शिकावं लागेल,जितका उशिर झालेला असेल तितकी अ, आ, इ, ई पासून सुरुवात करावी लागेल,वेळ लागेल,शाॅर्टकट शोधू नका.
4 / 8
कुणालाही काहीही सिध्द करुन दाखवायला जाऊ नका,ज्यांनी काळया रंगाचे चष्मे घातलेले आहेत त्यांना तुमचा पांढरा रंग कधीही दिसणार नाही. कुणालाही अद्दल घडवायला,सूड घ्यायला जाऊ नका,पाप पुण्याच्या नोंदी करणारा चित्रगुप्त आकाशात नाही शरीरात आहे,माणसाची मज्जासंस्था कर्माचा सूक्ष्मातिसूक्ष्म रेकाॅर्ड ठेवत असते,तुम्हाला त्रास देणा-यांना निसर्गाला सोपवा,विश्वास ठेवा निसर्ग न्याय करतोच !
5 / 8
'लाॅ ऑफ अट्रॅक्शन'चा अभ्यास करा. माझ्यात असं काय आहे ज्यानं मी ही माणसं ही परिस्थिती चुंबकासारखी खेचलीय ते शोधा, दुबळी माणसं शोषण करणाऱ्याला आकर्षून घेतात, स्वतःला बदला. माझ्या एक रोल माॅडल जवळपास दहा वर्ष होतील वारंवार सिक्रेट मूवी पहात आहेत, दरवेळी त्यांना नवं मार्गदर्शन मिळतं असं त्या म्हणतात.
6 / 8
बदल छोटेच करायचे आहेत,एखादं स्तोत्र म्हणायला सुरुवात करा,आहार बदला,चालायला जायला सुरुवात करा,टिव्हीवर,सोशल मिडियावर जे पहाताय ते बदला,मी 2000 पासून 22 वर्ष होतील एकही क्राईम सिरियल,सासू सून रडारड,मालिका भयानक बातम्या पाहिलेल्या नाहीत,माझं काही अडलं नाही,या गोष्टी न पाहून मी जगाच्या मागे राहिले असंही मला वाटत नाही,चांगली माणसं,चांगले अनुभव येतात,हे लिहिण्याचा हेतू सिक्रेट चं कौतुक करणं हाच आहे.
7 / 8
आपल्यावर ईतरांनी प्रेम करावं आपला आदर करावा,आपली काळजी घ्यावी यासाठी धडपडत असाल तरीही ते मिळत नसेल तर याचा थेट संबंध बालपणाशी आहे,स्वतःचं पालकत्व घ्या,हिलिंग करा,त्यासाठी Self Care/ Self Love चा अभ्यास करा आणि आधी स्वतःवर प्रेम करायला शिका.Inner child healing या विषयावर माहीती इंटरनेटवर फुकट आहे.
8 / 8
काय वाईट आहे,काय नकोय याची यादी वाचत बसू नका,तेच तेच आणखी दिसेल आणखी वाढेल,सोशल मिडियावर सहानुभूती शोधत बसू नका,मदत मागायचीच असेल तर,मी काय करु? स्वतःमधे काय बदल करु? माझं काय चुकतंय? हे विचारा.तरच उपयोग होईल.
टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य