mistakes to avoid in summer season
Health tips: उन्हाळ्यात 'या' चूका टाळाल तर आजारांपासून वाचाल, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 5:52 PM1 / 10उन्हाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. डॉ. मेघा यांच्यामते उन्हाळ्यात अतिसार, पित्त, डिहायड्रेशन आणि अपचन या समस्या जाणवतात.2 / 10यावर उपाय म्हणून पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे. तसेच लिंबू पाणी, ज्युस किंवा नारळ पाणी याचे सेवन करावे.3 / 10डॉक्टर उपासना यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या दिवसांत आपण जास्त प्रमाणात सरबत पितो. या सरबतांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढु शकते व तुमचं वजनही वाढू शकतं.4 / 10त्यामुळे सरबत पिण्याचं प्रमाण कमी करा. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. तळलेले पदार्थ खाणं टाळा.5 / 10तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांत गोड खावंस वाटत असेल तर आंबे खा, असं डॉक्टर मेघा सांगतात. बाहेरचे गोड पदार्थ खाणे पुर्णपणे टाळा. बाहेरचे खाण्यापेक्षा आंबा खाणे कधीही चांगलेच. त्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि तुमच्या आहारात एक हेल्दी पदार्थ म्हणून याचा उपयोग होईल. 6 / 10पण लक्षात ठेवा तुम्ही आंबे एखाद्या मिड मिल म्हणजे जेवणानंतर न खाता सकाळी नाश्त्यानंतर थोड्यावेळाने खा. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.7 / 10तसेच तुम्ही उन्हाळ्यात आईसक्रीमही खाऊ शकता. मात्र तेही जेवणानंतर न खाता मिड मिल म्हणूनच खा कारण आईसक्रीम पचायला वेळ लागतो.8 / 10उन्हाळ्यात सर्वात जास्त समस्या भेडसावते ती ब्लड प्रेशरची. अनेकांना उन्हाळ्यात उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. अशावेळी सकाळी किंवा रात्रीचे कोणतेही जेवण टाळू नये. अनेकजण वजन कमी करण्यासाठी सकाळचे जेवण करत नाहीत. जेवण स्कीप करणे अत्यंत चूकीची सवय आहे.9 / 10अनेकदा लोक उन्हाळ्यात बाहेरुन घरी आल्यावर थंड पाणी पितात. हे अत्यंत चुकीचे आहे. उन्हातून घरात आल्यावर साधे पाणी प्यावे. मग फळ अथवा सॅलेड खावे. त्यानंतर जेवण करावी. हेच रुटीन फॉलो करावे. काहीजण उन्हातून घरी आल्यावर लगेच जेवतात. यामुळे अतिसाराचा त्रास होऊ शकतो.10 / 10विशेष करुन ज्या व्यक्ती डाएटिंगवर आहेत त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की उन्हाळ्यात सकाळचा नाश्ता महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात सकाळी व्यवस्थित भरपेट नाश्ता करावा. त्यानंतरच घराबाहेर पडावे. डाएटिंग करताना काहीवेळा नाश्ता स्कीप केला जातो. असे करु नये. आणखी वाचा Subscribe to Notifications