शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Monkeypox : भारतात मंकीपॉक्सची एन्ट्री, लैंगिक संबंधातून पसरतो; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 12:33 PM

1 / 9
जगातल्या 71 देशांमध्ये मंकीपॉक्स हा आजार पसरला असून आता भारतातही याचा शिरकाव झाला आहे. केरळच्या तिरूवनंतपुरममध्ये परदेशातून आलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं दिसली. त्याचे सॅम्पल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीला पाठवण्यात आले आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की, व्यक्तीला लक्षणं दिसल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
2 / 9
अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनुसार, मंकीपॉक्स एक दुर्मीळ आजार आहे. जो मंकीपॉक्स व्हायरसने पसरतो. हा व्हायरस त्याच वॅरियोला व्हायरल परिवारातील आहे, ज्याने देवी हा आजार पसरतो. मंकीपॉक्सची लक्षणं देवीसारखीच असतात. काही केसेसमध्ये मंकीपॉक्स जास्त घातक ठरू शकतो.
3 / 9
काय आहे मंकीपॉक्स? - अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनुसार, पहिल्यांदा हा आजार 1958 मध्ये समोर आला होता. तेव्हा रिसर्चसाठी वापरलेल्या एका माकडामध्ये हे संक्रमण आढळून आलं होतं. त्यामुळे याचं नाव मंकीपॉक्स ठेवण्यात आलं. या माकडांमध्ये देवीसारखी लक्षणं दिसली होती.
4 / 9
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, मनुष्याला मंकीपॉक्स झाल्याची पहिली केली 1970 मध्ये समोर आली होती. तेव्हा कॉन्गोमध्ये राहणाऱ्या एका 9 वर्षाच्या मुलामध्ये हे संक्रमण आढळलं होतं. 1970 नंतर 11 आफ्रिकी देशांमध्ये मनुष्यांना मंकीपॉक्स झाल्याच्या केसेस आढळल्या होत्या. जगात मंकीपॉक्सचं संक्रमण आफ्रिकेतून पसरलं. 2003 मध्ये अमेरिकेत मंकीपॉक्सच्या केसेस समोर आल्या होत्या.
5 / 9
कसा पसरतो मंकीपॉक्स? - मंकीपॉक्स एखाद्या संक्रमित प्राण्याच्या रक्तातून, त्याच्या शरीरावरील घामातून किंवा त्याच्या जखमांच्या थेट संपर्कात आल्याने पसरतो. आफ्रिकेत उंदरांमध्येही मंकीपॉक्स आढळला. अर्ध शिजलेलं मांस किंवा संक्रमित प्राण्याच्या उत्पादनांचं सेवन केल्यानेही संक्रमण वाढतं. मनुष्यातून मनुष्याला संक्रमण झाल्याच्या फार कमी केसेस समोर आल्या आहेत. मात्र, संक्रमित व्यक्तीला स्पर्श केल्याने किंवा त्याच्या संपर्कात आल्याने हे संक्रमण पसरू शकतं.
6 / 9
सेक्स केल्यानेही पसरतो मंकीपॉक्स? - मंकीपॉक्स शारीरिक संबंध ठेवूनही पसरतो. समलैंगिक आणि बायसेक्शुअल लोकांना याच्या संक्रमणाचा जास्त धोका राहतो. WHO नुसार, अलिकडे ज्या देशांमध्ये मंकीपॉक्सच्या केसेस समोर आल्या, त्यांच्यातील अनेकांना हे संक्रमण लैंगिक संबंध ठेवल्याने पसरलं. CDC नुसार, जर तुम्ही मंकीपॉक्सने संक्रमित व्यक्तीसोबत संबंध ठेवले तर तुम्हाला संक्रमण होऊ शकतं. संक्रमित व्यक्तीला मिठी मारणे, किस करणे आणि इतकंच काय तर समोरसमोर कॉन्टॅक्स केल्याने संक्रमण परसण्याचा धोका असतो.
7 / 9
काय आहेत लक्षणे - मंकीपॉक्स व्हायरसचा इन्क्यूबेशन पीरियड 6 ते 13 दिवसांपर्यंत असतो. कधी कधी 5 ते 21 दिवसांपर्यंत होतो. इन्क्यूबेशन पीरियडचा अर्थ संक्रमित झाल्यावर लक्षणं दिसायला किती दिवस लागलेत. संक्रमित झाल्यावर 5 दिवसांच्या आता ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, मांसपेशींमध्ये वेदना आणि थकवा अशी लक्षणं दिसतात. मंकीपॉक्स सुरूवातीला चिकनपॉक्स, देवीसारखा दिसतो. ताप आल्यावर एक ते तीन दिवसात याचा प्रभाव त्वचेवर दिसू लागतो. शरीरावर पुरळ येऊ लागते. ही पुरळ जखमांसारखी दिसते आणि स्वत:हून सुकून नष्ट होते.
8 / 9
WHO नुसार, मंकीपॉक्सने संक्रमित प्रत्येक 10व्या व्यक्तीचा मृत्यू होतो. मंकीपॉक्सने संक्रमित झाल्यावर 2 ते 4 आठवड्यांनंतर लक्षणं हळूहळू दूर होतात. लहान मुलांना गंभीर संक्रमण होण्याचा धोका असतो. जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना मंकीपॉक्सचा धोका जास्त राहतो. देवी आजार संपल्यावर या आजाराचं वॅक्सीनेशनही बंद झालं आहे. त्यामुळे 40 ते 50 वयापेक्षा कमी लोकांना मंकीपॉक्सचा धोका जास्त राहतो.
9 / 9
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाइट असलेल्या माहितीनुसार, सध्या मंकीपॉक्सवर कोणताही ठोस उपचार नाही. देवीची वॅक्सीन मंकीपॉक्सच्या संक्रमणाविरोधात 85 टक्के प्रभावी ठरली आहे. पण सध्या देवीची वॅक्सीन सामान्य लोकांसाठी उपलब्ध नाही. 2019 मध्ये देवी आणि मंकीपॉक्स रोखण्यासाठी एका वॅक्सीनला मंजूरी देण्यात आली होती. पण ती सुद्धा पूर्णपणे उपलब्ध नाही.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स