monkeypox virus infection causes zoonotic diseases statistics nonveg diet spread diseases
आधी कोरोना, आता मंकीपॉक्सचा धोका... नॉनव्हेजमुळे जीवघेणे आजार पसरतात का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:02 AM1 / 10सार्स २००२ मध्ये आला. मर्स आणि H1N1 स्वाइन फ्लू २००९ मध्ये पसरला. इबोलाचा अधून-मधून फैलाव असल्याचे चित्र आहे. झिका व्हायरस सुद्धा अद्याप चर्चेत आहे. २०१९ च्या उत्तरार्धात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. यानंतर आता मंकीपॉक्स पसरत आहे. हे असे काही आजार आहेत, जे गेल्या १५-२० वर्षांत जगभर पसरले आहेत. या सर्वांचा एकच स्रोत होता आणि तो म्हणजे प्राणी. 2 / 10वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) अंदाजानुसार दरवर्षी १ अब्जाहून अधिक नागरिक प्राण्यांद्वारे पसरलेल्या रोगांमुळे आजारी पडतात. यातील लाखोंचा मृत्यूही झाला आहे. तसेच, डब्ल्यूएचओने असाही दावा केला आहे की, गेल्या तीन दशकांत मानवांमध्ये ३० नवीन आजार आढळून आले आहेत आणि त्यापैकी ७५ टक्के प्राण्यांमुळे पसरले आहेत. हे आजार जनावरांना खाल्ल्याने किंवा त्यांना बंदिस्त ठेवल्याने पसरतात.3 / 10१९५० च्या दशकात पोलिओ हा एक धोकादायक आजार होता. वैज्ञानिक त्याच्या लसीवर काम करत होते. लसीच्या चाचण्यांसाठी मोठ्या प्रमाणात माकडांची आवश्यकता होती. या माकडांना प्रयोगशाळेत ठेवण्यात आले होते. अशीच एक प्रयोगशाळा डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्येही होती. १९५८ मध्ये येथील प्रयोगशाळेत ठेवण्यात आलेल्या माकडांमध्ये एक विचित्र आजार दिसला होता. या माकडांच्या अंगावर चेचक सारखे पुरळ उठले होते. या माकडांना मलेशियातून कोपनहेगनला आणण्यात आले होते. या माकडांची तपासणी केली असता त्यांच्यामध्ये नवीन विषाणू आढळून आला. या विषाणूला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले.4 / 10१९५८ ते १९६८ यादरम्यान, आशियामधून येणाऱ्या शेकडो माकडांमध्ये मंकीपॉक्सचा विषाणू अनेक वेळा पसरला. त्यावेळी शास्त्रज्ञांना वाटले की, हा विषाणू फक्त आशियातून पसरत आहे. परंतु भारत, इंडोनेशिया, मलेशिया आणि जपानमधील हजारो माकडांच्या रक्ताची चाचणी केली असता, त्यांच्यामध्ये मंकीपॉक्सच्या विरूद्ध अँडिबॉडी आढळले नाहीत. शास्त्रज्ञांना याचे आश्चर्य वाटले, कारण वर्षांनंतरही त्यांना या विषाणूचा मूळ स्रोत (ओरिजनल सोर्स) सापडला नाही.5 / 10या विषाणूचे गूढ १९७० मध्ये उकलले, जेव्हा पहिल्यांदाच एखाद्या माणसाला याची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर काँगोमध्ये राहणाऱ्या ९ महिन्यांच्या मुलाच्या शरीरावर पुरळ उठली. हे प्रकरण आश्चर्यकारक होते, कारण १९६८ मध्ये चेचक पूर्णपणे नष्ट झाले होते. नंतर या मुलाच्या नमुन्याची तपासणी केली, असता त्यात मंकीपॉक्स असल्याचे स्पष्ट झाले.6 / 10माणसाला मंकीपॉक्सची लागण झाल्याच्या पहिल्या प्रकरणानंतर, जेव्हा अनेक आफ्रिकन देशांमध्ये माकड आणि गिलहरींची चाचणी करण्यात आली, तेव्हा त्यांच्यामध्ये मंकीपॉक्सच्या विरूद्ध अँडिबॉडी आढळले. यावरून, शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला की मंकीपॉक्सचा ओरिजनल सोर्स आफ्रिका आहे. हा विषाणू आफ्रिकेतून आशियाई माकडांमध्ये पसरला असावा. यानंतर, काँगोशिवाय, बेनिन, कॅमेरून, गॅबॉन, लायबेरिया, नायजेरिया, दक्षिण सुदानसह अनेक आफ्रिकन देशांमध्ये मानवांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची अनेक प्रकरणे नोंदवली जाऊ लागली.7 / 10हा विषाणू २००३ मध्ये पहिल्यांदा आफ्रिकेबाहेर पसरला. त्यानंतर अमेरिकेतील एका व्यक्तीला याची लागण झाल्याचे आढळून आले. हा संसर्ग त्याच्या पाळीव कुत्र्यापासून त्याला पसरला होता. हा कुत्रा आफ्रिकन देश घाना येथून आणला होता. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये इस्रायल, मे २०१९ मध्ये यूके, डिसेंबर २०१९ मध्ये सिंगापूर सारख्या देशांमध्ये या विषाणूची प्रकरणे देखील दिसू लागली. भारतातही एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. ५० वर्षांनंतरही, मंकीपॉक्सच्या संसर्ग आणि प्रसाराबाबत अनेक अभ्यास केले जात आहेत.8 / 10डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा आजार आहे. मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ आजार आहे, जो मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गामुळे होतो. हा विषाणू त्याच व्हॅरिओला विषाणू कुटुंबाचा भाग आहे, ज्यामुळे चेचक होतो. मंकीपॉक्सची लक्षणे चेचक सारखीच असतात. मंकीपॉक्स अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरतो.9 / 10कोरोनाव्हायरसबद्दल, असे मानले जात होते की ते वटवाघुळ किंवा पँगोलिनद्वारे पसरले असावे. त्याचप्रमाणे मंकीपॉक्सबाबत अद्याप असा कोणताही पुरावा नाही. सिंगापूरच्या फूड एजन्सीचा असा विश्वास आहे की आफ्रिकेतून येणारे मांस मंकीपॉक्स पसरवू शकते. तसेच, मंकीपॉक्सबद्दल ऐकल्यानंतर माकड पाहून घाबरून जाण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, एकदा का विषाणूचा संसर्ग माणसांकडून माणसात सुरू झाला की, प्राण्यांची भूमिका बरीच कमी होते.10 / 10काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी इशारा दिला होता की, कोरोना ही शेवटची महामारी नाही. भविष्यात आपल्याला आणखी साथीच्या आजारांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे जनावरांमध्ये पसरणाऱ्या आजारांवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. २०१३ मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचा एक अहवाल समोर आला, ज्यामध्ये असे म्हटले होते की पशुधन आरोग्य हा आपल्या जागतिक आरोग्य साखळीतील सर्वात कमकुवत दुवा आहे. एका अहवालात असे दिसून आले आहे की, जगातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त मांस फॅक्टरी फार्ममधून येते. या फार्ममध्ये जनावरांची गर्दी ठेवली जाते. त्यामुळे विषाणूजन्य आजार पसरण्याचा धोका वाढतो. आणखी वाचा Subscribe to Notifications