शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं टेन्शन मिटणार; स्पर्म रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधला नवा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 6:11 PM

1 / 9
बर्थ कंट्रोल करण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु अनेकजण कंडोम आणि औषधाचा वापर करणं सहज आणि प्रभावी गर्भनिरोधक मानतात. परंतु काही असेही कपल्स आहेत ज्यांना प्रेग्नेंसी नको असते तरीही ते कुठल्याही प्रोटेक्शनचा वापर करत नाहीत.
2 / 9
काही महिला अनावश्यक गर्भधारणा रोखण्यासाठी पिल्सचा वापर करतात पण साइड इफेक्टमुळे काहीजणी ते घेण्यापासून घाबरतात. विना प्लॅनिंग प्रेग्नेंसी करणाऱ्यांची संख्या जगात खूप आहेत. परंतु आता वैज्ञानिकांनी बर्थ कंट्रोल करण्याचा नवा पर्याय शोधून काढला आहे. ज्याचा वापर कुणीही बिनधास्त आणि सहजपणे करू शकतं.
3 / 9
विशेष गोष्ट म्हणजे वैज्ञानिक मोनोक्लोनल अँटीबॉडीजसह हे गर्भनिरोधक बनवत आहेत. त्यांचा दावा आहे की, महिलांच्या हार्मोन्समध्ये कोणताही बदल न करता हे गर्भनिरोधक अधिक चांगले काम करेल. मोनोक्लोनल अँटीबॉडीज व्हायरस प्रमाणेच रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे शुक्राणूंवर हल्ला करतात
4 / 9
या गर्भनिरोधक पद्धतीचं जर्नल सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन आणि ईबायोमेडिसिनमध्ये तपशीलवार माहिती दिली आहे. अभ्यासानुसार, मोनोक्लोनल अँटीबॉडीज स्पर्मना पकडून त्यांना खूप कमकुवत बनवतात. गर्भनिरोधक म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो का आणि योनीमध्ये ते घालणे किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्याचाही या स्टडी रिपोर्टमध्ये प्रयत्न केला आहे.
5 / 9
कोविड -१९ च्या उपचारांमध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीज देखील वापरल्या गेल्या आहेत. स्टडी रिपोर्टचे लेखक अँडरसनच्या मते, या अँटीबॉडीज शुक्राणूंना बांधण्यासाठी खूप प्रभावी असल्याचं आढळलं आहे. गर्भनिरोधक पातळ पडद्यासारखे असेल जे कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येईल. हे पूर्ण २४ तास आपले काम करेल.
6 / 9
अँडरसन म्हणाले, 'मला वाटते की अधूनमधून संभोग करणाऱ्या महिलांमध्ये हे अधिक लोकप्रिय होईल. अशा स्त्रिया पिल्ससारख्या औषधांचा वापर टाळतात ज्यांचा हार्मोनवर दीर्घकाळ परिणाम होतो. त्यांना निश्चितपणे अशा उत्पादनाची गरज आहे जे ते त्यांच्या गरजेनुसार वापरू शकतात.
7 / 9
वैज्ञानिकांच्या एका गटाने मेंढ्यांवर गर्भनिरोधक म्हणून या अँटीबॉडीजचा वापर केला. स्टडीत, मोनोक्लोनल अँटीबॉडीज नैसर्गिक अँटीबॉडीजपेक्षा शुक्राणूंवर अधिक प्रभावी आणि शक्तिशाली असल्याचं आढळलं. त्याच वेळी, अँडरसनच्या टीमने काही महिला स्वयंसेवकांवर त्याचे डोस आणि सुरक्षितता समजून घेण्यासाठी क्लिनिकल चाचणी केली.
8 / 9
क्लिनिकल चाचणीच्या पहिल्या टप्प्यात, ९ महिलांना एका आठवड्यासाठी दररोज वजाइना (योनी)मध्ये अँटीबॉडीज इंजेक्शनद्वारे दिली. या व्यतिरिक्त, संशोधकांनी २९ महिलांवर प्लेसबो स्टडीही केली. अँटीबॉडी गटातील स्त्रियांच्या योनीचा पीएच प्लेसबो गटातील स्त्रियांसारखाच आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीज लावणाऱ्या महिलांमध्येही बॅक्टेरियाचा संसर्ग आढळला नाही
9 / 9
चाचणीमध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीज महिलांमध्ये २४ तास सुरक्षित आणि सक्रिय असल्याचं आढळलं. परंतु संशोधकांनी या स्टडीच्या ठोस दाव्यासाठी लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिलांच्या मोठ्या गटावर त्याची चाचणी करणे आवश्यक आहे. याशिवाय, संशोधकांनी आणखी एका अँटीबॉडीवर काम सुरू केले आहे जे पुरुषांसाठी गर्भनिरोधक जेल म्हणून वापरले जाईल. पुरुषांसाठी, हे कंडोम आणि नसबंदीसाठी एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते.
टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसी